स्नान करण्याची पद्धत (भाग १)

अनुक्रमणिका

१. स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना अन् स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
१ अ. जलदेवतेला करावयाची प्रार्थना
१ आ. नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व
१ इ. स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
२. स्नान करण्याची पद्धत
२ अ. स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नान करणे योग्य
२ आ. नग्न होऊन स्नान करू नये.


या लेखातून आपण स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना आणि स्नान करतांना श्लोक किंवा नामजप करण्यामागील शास्त्र जाणून घेणार आहोत. तसेच स्नान करण्याची शास्त्रीय पद्धतही या लेखात विशद करण्यात आली आहे. या लेखातून आपल्याला लक्षात येईल की मानवाची केवळ पूजा-अर्चा, नामजप यांतूनच नव्हे, तर स्नानासारख्या दैनंदिन कृतीतूनही साधना कशी होईल, याची हिंदु धर्माने सोय करून ठेवली आहे. यांतून हिंदु धर्माचे एकमेवादि्वतीयत्त्व पुन: एकदा अधोरेखित होते.

१. स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना अन् स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक

१ अ. जलदेवतेला करावयाची प्रार्थना

‘हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझ्या स्थूलदेहाभोवती आलेले रज-तम यांचे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊ दे. बाह्यशुद्धीप्रमाणे माझे अंतर्मनही स्वच्छ आणि निर्मळ होऊ दे.’

१ आ. नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व

१ आ १. शास्त्र : ‘नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान केल्याने पाण्यातील अंगीभूत चैतन्य जागृत होऊन त्याचा देहाला स्पर्श होऊन चैतन्याचे संक्रमण पेशीपेशींपर्यंत होते आणि त्यामुळे देहाला देवत्व प्राप्त होऊन दिवसभरातील कृती चैतन्याच्या स्तरावर करण्यास देह सक्षम बनतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१०.२००७, दुपारी १.२३)

१ इ. स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक

१. गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। – नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक ३३

अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु आणि कावेरी, तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.

२. गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी
पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वन्तु मे मङ्गलम् ।।

अर्थ : गंगा, सिंधु, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबळा, वेदिका, कि्षप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया अन् गण्डकी या नद्या, पवित्र आणि परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करोत.

३. नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपाम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।।

अर्थ : सर्व ऐहिक सुख, भोग अन् मोक्ष देणार्‍या हे गंगामाते, तुझे जे चरणकमल सर्व देव-दैत्य यांना वंदनीय आहेत, अशा तुझ्या चरणांना मी वंदन करतो.

४. गङ्गा गङ्गेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि ।
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ।।
तीर्थराजाय नमः ।

अर्थ : शेकडो मैल (योजने) दुरून जो कोणी ‘गंगा, गंगा, गंगा’, असे गंगेचे स्मरण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णुलोकी जातो.

५. पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभवः ।
त्राहि मां कृपया गङ्गे सर्वपापहरा भव ।।

अर्थ : मी वाईट कर्मा आहे. साक्षात पाप म्हणजे मूर्तीमंत वाईटच आहे. मी वाईटातून निर्माण झालो आहे. हे गंगामाते, तू माझ्या पापांचे हरण करून माझे रक्षण कर.

२. स्नान करण्याची पद्धत

२ अ. स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नान करणे योग्य

वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात झालेल्या रज-तमात्मक लहरींचे
संक्रमण स्नानाच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होणे

२ अ १. शास्त्र : ‘कित्येक स्त्रिया केस विस्कटतात, म्हणून स्नानानंतर वेणी घालतात; परंतु आधी वेणी घालून मगच स्नान करण्याची पद्धत आहे. वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात जे काही रज-तमात्मक लहरींचे संक्रमण झालेले असते, ते आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होते. उलट आंघोळीनंतर वेणी घातल्याने देह परत अशुद्ध होतो. यावरून असे लक्षात येते की, कलियुगातील मनुष्य केवळ बाह्य स्वच्छतेकडे, म्हणजेच देहाच्या बाह्य सौंदर्याकडे पहाणारा बनलेला असून तो जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याच्या सिद्धांतापासून, म्हणजेच खर्‍या आचारापासून दूर गेलेला आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२ अ २. अनुभूती – स्नानानंतर वेणी घातल्यामुळे मुखावर त्रासदायक शक्तीचे आवरण येण्याचे प्रमाण वाढणे आणि स्नानापूर्वी वेणी घातली असता मुखावर आवरण येणे आणि डोक्यावर दाब जाणवणे यांचे प्रमाण घटून उत्साह जास्त वेळ टिकून रहाणे : ‘लहानपणापासूनच मला स्नान करण्यापूर्वी वेणी घालण्याची सवय होती. १९९१ साली मी महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर ती सवय सुटली. तेव्हा मी स्नानानंतर वेणी घातल्यामुळे माझ्या मुखावर त्रासदायक शक्तीचे आवरण येण्याचे प्रमाण वाढले. या तुलनेत स्नानापूर्वी वेणी घातली असता ‘मुखावर आवरण येणे अन् डोक्यावर दाब जाणवणे यांचे प्रमाण घटून माझा उत्साह जास्त वेळ टिकून रहातो’, असे मला जाणवले. त्यामुळे गेल्या काही मासांपासून मी पुन्हा स्नानापूर्वी वेणी घालण्यास आरंभ केला.’
– कु. स्वप्ना, सोलापूर (१२.१२.२००७)

२ आ. नग्न होऊन स्नान करू नये.

वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून नग्न होऊन स्नान करू नये

२ आ १. शास्त्र : ‘नग्नता ही पूर्णपणे देहातील भोकांतून सूक्ष्म रज-तमात्मक वायू ऊत्सर्जनाला पूरक ठरणारी सि्थती असते. ही सि्थती वातावरणात एक रज-तमात्मक वायूभारित मंडल बनवते. योनीमार्ग किंवा गुदद्वार यांतून होणारे टाकाऊ वायूंचे सूक्ष्म-ऊत्सर्जन वायूमंडलातील त्रासदायक लहरींच्या स्पर्शामुळे वेगाने चालू झाल्याने या मार्गांकडे पाताळातून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने आकृष्ट होऊन संपूर्ण देह रज-तमाने भारित होतो. या सि्थतीत केलेल्या स्नानाचा विशेष लाभ होत नाही. याउलट अंतर्वस्त्राने कटिबंध क्षेत्रात निर्माण होणार्‍या दबावदर्शक प्रक्रियेमुळे मणिपूरचक्र (नाभीच्या ठिकाणी असलेले) जागृत सि्थतीत राहून टाकाऊ वायूंचे आतल्याआतच पोकळीत विघटन करते. हे चक्र जागृत सि्थतीत आल्याने स्नानातून मिळणार्‍या सात्ति्वक लहरी ग्रहण करण्यास देह संवेदनशील बनतो. याचा लाभ जिवाला मिळून त्याच्यासाठी स्नान हा आचार शुभ होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ८)

<!– या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे ‘कि्लक’ करा !
–>

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment