संतांच्या छायाचित्रावर डाग पडणे, या बुद्धीअगम्य घटनेचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला
खोटे ठरवणारे असतात तथाकथित पुरोगामी, तर अध्यात्म
विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी 'सनातन संस्था' आहे खरी पुरोगामी !

प.पू. डॉक्टर यांचे विद्रूप झालेले छायाचित्र, यामधून वाईट स्पंदने प्रक्षेपित होत आहेत का, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळून पहाण्याच्या उद्देशाने येथे 'आर्.एफ्.आय.' (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) आणि 'पिप' (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानांद्वारे त्या छायाचित्राची चाचणी करण्यात आली.

१. घडलेली बुद्धीअगम्य वाईट घटना

१ अ. साधिकेकडील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात त्यांच्या ओठांचा आणि
दातांचा भाग अतिशयविद्रूप होणे अन् प्रत्यक्षातही याच काळात प.पू. डॉक्टरांच्या
दातांच्या तक्रारीत वाढ होऊन त्यांना सतत दंतवैद्यांकडे जाऊन उपचार करावे लागणे

मार्च २०१२ मध्ये एका साधिकेला स्वतःकडे असलेले प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र अतिशय विद्रूप झालेले आढळले. या छायाचित्रात प.पू. डॉक्टरांच्या ओठांचा भाग ठिकठिकाणी फाटलेला दिसतो. त्यांच्या ओठांवर मुखातून रक्त ओघळल्यासारखा डाग पडलेला दिसतो, तसेच त्यांचे दातही विद्रूप दिसतात. हे छायाचित्र एक सेकंदही हातात धरवत नाही. लगेच त्रास होतो. याच कालावधीत प्राणशक्ती न्यून असल्याने प.पू. डॉक्टरांच्या तोंडाला सतत कोरड पडत होती. तोंडाला कोरड पडल्याने तोंडातील लाळेचे प्रमाण न्यून होऊन दातांचे संरक्षण गेल्याने दात आतून पोखरल्यासारखे झाले होते, तसेच दातांचा मूळचा रंग पालटून काळसर-पिवळसर झाला होता. दात झिजल्यासारखे होऊन त्यांची टोके धारदार झाल्याने ती जिभेला लागून तोंडातील जखमांचे प्रमाण वाढले होते. बोलतांना जीभ दाताखाली येण्याचे प्रमाणही वाढले होते. अशा प्रकारे विविध त्रास होत असल्याने दात काढून टाकण्याचा निर्णय तेव्हा दंतवैद्यांनी घेतला.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. घडलेल्या बुद्धीअगम्य वाईट घटनांच्या संदर्भात वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक (चांगली) किंवा नकारात्मक (वाईट) स्पंदने आहेत, ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही किंवा ती वस्तू आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. भक्त, साधक संतांनी सांगितलेले शब्दप्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते. प.पू. डॉक्टर यांचे तोंडावर रक्तासारखा डाग पडून विद्रूप झालेले छायाचित्र, यामधून वाईट स्पंदने प्रक्षेपित होत आहेत का, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळून पहाण्याच्या उद्देशाने येथे 'आर्.एफ्.आय.' (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) आणि 'पिप' (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानांद्वारे त्या छायाचित्राची चाचणी करण्यात आली. तुलनेसाठी तशाच चांगल्या छायाचित्राची चाचणीही केली. या चाचणींची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

३. 'आर्.एफ्.आय'. रीडींग उपकरण आणि 'पिप' तंत्रज्ञान यांची ओळख

'आर्.एफ्.आय'. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) रीडींग उपकरणाच्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्विंक ऊर्जा मोजू शकतो, तर 'पिप' (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. 'पिप' या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पहाता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. 'पिप' प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे, तर निळा रंग सात्त्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे. सोनेरी छटा असलेला पिवळा रंग उच्च स्तरीय वैश्विक स्पंदने दर्शवतो.

४. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण


छायाचित्र क्र. १


छायाचित्र क्र. २

– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्विशक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे) (एप्रिल २०१२)

५. वैज्ञानिकांना आवाहन

सनातनचे साधक गेल्या १२ ते १५ वर्षांच्या त्यांच्या साधनेच्या प्रवासात अनेक चांगल्या आणि वाईट बुद्धीअगम्य घटना घडत असल्याचे अनुभवत आहेत. या बुद्धीअगम्य घटनांच्या संदर्भात सनातन संस्था संशोधन करत आहे. या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना संशोधनांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍याकडून साहाय्यता मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

(संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected])