‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ उपकरणाद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या संदर्भातील अभ्यास

‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे ‘हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून’ आणि ‘पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे केक कापून’वाढदिवस साजरा करण्याच्या संदर्भात केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला खोटे ठरवणारे असतात
तथाकथित ‘पुरोगामी’, तर अध्यात्म विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी ‘सनातन संस्था’ आहे खरी पुरोगामी !

हिंदु संस्कृतीत आचारधर्माचे पालन करण्यास सांगितले आहे. धर्माचरणाच्या पालनाने मनुष्याला सात्त्विकतेचा लाभ होतो आणि त्याच्यावर झालेला रज-तमाचा प्रभाव अल्प होतो. पालन करायच्या आचारांमध्ये दिनचर्या, अन्नग्रहण, वस्त्रधारण, अलंकार परिधान करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. कलियुगात भारतात आचारधर्म लोप पावत आहे. वाढदिवस साजरा करण्याचा आचारही याला अपवाद नाही.

हिंदु धर्मात औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यास सांगितले आहे. यामध्ये ताम्हणातील दिव्याच्या साहाय्याने ओवाळले जाते. या दिव्याच्या ज्योतीकडे ब्रह्मांडातील देवतांच्या लहरी आकर्षित होतात आणि त्या औक्षण करून घेणार्‍याकडे प्रक्षेपित होतात. औक्षण करून घेणाराही दिव्याला भावपूर्णपणे नमस्कार करत असल्याने त्याला देवतांचा कृपाशीर्वाद मिळतो. अशी भावपूर्ण कृती पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात नाही. उलट त्यामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करतांना केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवल्या जातात. हिंदु धर्मात ज्योत विझवणे या कृतीला अशुभ आणि त्याज्य मानले आहे. असे असूनही काही हिंदू पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहेत.

हिंदूंना धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशानेच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून आणि पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा काय परिणाम होतो, याचा ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ (Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे अभ्यास करण्यात आला. या प्रयोगांची माहिती येथे देत आहोत.

 

१. प्रयोगाची तत्त्वप्रणाली

‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ उपकरणाद्वारे ज्या व्यक्तीचे स्कॅनिंग करायचे असते, त्या व्यक्तीचे कपाळ, तळहात आणि तळपाय यांवर इलेक्ट्रोडची प्रत्येकी एक जोडी लावून तिच्या शरिरात विद्युत ऊर्जेचा अती सौम्य प्रवाह सोडला जातो. त्यानंतर व्यक्तीचे स्कॅनिंग केल्यावर तिच्या शरिरातील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार या ७ कुंडलिनीचक्रांच्या कार्यरत असलेल्या स्थितीचा आलेख संगणकावर उमटतो.

 

२. प्रयोग

जानेवारी २००९ मध्ये केलेल्या या प्रयोगांत १ मुलगा सहभागी झाला होता. उपकरणाद्वारे प्रथम मुलाचे स्कॅनिंग करून त्याच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेच्या स्थितीचे निरीक्षण (रिडींग) घेतले. नंतर प्रथम त्या मुलाने पाश्चात्त्य पद्धतीने केक कापून वाढदिवस साजरा केल्यावर ठराविक कालावधीने स्कॅनिंग करून त्याच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेच्या स्थितीची निरीक्षणे घेतली. मुलाच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेची मूळ स्थिती जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत निरीक्षणांची नोंद केली. त्यानंतर त्याचा हिंदु संस्कृतीनुसार औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. नंतरही आधीच्या प्रयोगाप्रमाणेच ठराविक कालावधीने स्कॅनिंग करून त्याच्या सप्तचक्रांच्या कार्यरततेच्या स्थितीची निरीक्षणे घेतली. या नोंदी कशा असतात, हे कळण्यासाठी येथे आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्या मुलाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या एका निरीक्षणाच्या नोंदी बघूया. मुलाने केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर १३ घंटे ४२ मिनिटे या कालावधीनंतर त्याच्या सप्तचक्रांच्या मूळ नोंदींमध्ये कसा फरक पडला, हे यावरून लक्षात येईल.

प्रयोगामध्ये एखाद्या चक्राच्या नोंदीची संख्या त्या चक्राच्या मूळ स्थितीतील नोंदीपेक्षा न्यून होणे, म्हणजे ते चक्र निष्क्रीय होणे आणि याउलट ती संख्या वाढणे, म्हणजे ते चक्र सक्रीय किंवा कार्यरत होणे.

वरील सारणीवरून केक कापून वाढदिवस साजरा केल्यामुळे मुलाची सहस्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत ही वरील चार चक्रे निष्क्रीय झाली आहेत, असे लक्षात येते. केक कापून वाढदिवस साजरा केल्यावर नोंद केलेल्या निरीक्षणांचा आलेख पुढे दिल्याप्रमाणे आहे.

३. प्रयोगातील निरीक्षणे

अ. मुलाचा हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच्या सहस्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली.

आ. मुलाचा हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून वाढदिवस साजरा केल्यामुळे त्याच्या मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या खालील ३ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली.

इ. मुलाचा पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच्या वरील ४ चक्रांची निष्क्रियता वाढली.

ई. मुलाचा पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच्या खालील ३ चक्रांपैकी स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली, तर मणिपूरचक्राची निष्क्रीयता वाढली.

उ. मुलाचा हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या कृतीचा परिणाम टिकण्याचा कालावधी ५० घंटे ३४ मिनिटे इतका होता, तर पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या कृतीचा परिणाम टिकण्याचा कालावधी ९५ घंटे ७ मिनिटे इतका अधिक होता.

ऊ. मुलाचा हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून आणि पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर वरील ४ चक्रांपैकी केवळ आज्ञाचक्राची निष्क्रीयता इतर तीन चक्रांच्या निष्क्रीयतेपेक्षा पुष्कळ वाढली.

 

४. वाढदिवस हिंदु संस्कृतीनुसार औक्षण करून साजरा करू लागल्यापासून मुलामध्ये पालट होणे

वर्ष २००३ पासून मी माझा मुलगा चि. प्रणव याचा वाढदिवस हिंदु संस्कृतीनुसार औक्षण करून साजरा करू लागले. तेव्हापासून त्याचे त्रासदायक वागणे न्यून झाल्याचे जाणवते. तो अभ्यास चांगल्यारितीने करू लागला, त्याची चीडचीड न्यून झाली. तो देवाचा नामजप करू लागला, तसेच तो मलाही त्रास न देता ध्यान करण्याकरता बसू देतो. – सौ. राजश्री माणिकपुरे, वर्धा (वर्ष २००५)

 

५. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांचे निष्कर्ष आणि व्यक्तीवर होणारे परिणाम यांच्या संदर्भात सनातन संस्था संशोधन करत आहे. यामध्ये पुढील गोष्टीही अभ्यासणे चालू आहे.

अ. प्रत्येक वस्तूमध्ये सत्त्व-रज-तम या गुणांचे ठराविक प्रमाण असते आणि त्याचा इतर गोष्टींवर परिणाम होतो. तसा हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून वाढदिवस साजरा करणे आणि पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा करणे या कृतींतील त्रिगुणांचा सप्तचक्रांवर काय परिणाम झाला ?

आ. व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीचा काय परिणाम होतो ?

इ. व्यक्तीच्या सप्तचक्रांवर सात्त्विकता किंवा असात्त्विकता यांचा वेगवेगळा परिणाम होतो का ?

या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍याकडून साहाय्यता मिळाल्यास आम्ही आभारी होऊ. (संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected]

 संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment