सनातनचे साधक मनोभावे सेवा करत असल्याने आश्रमात दैवी शक्ती जाणवते ! – कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

पनवेल, १९ जून (वार्ता.) – प्रत्येक साधक मनोभावे सेवा करत असल्याने सनातनच्या आश्रमामध्ये दैवी शक्ती जाणवते, तसेच येथील वातावरणात पुष्कळ प्रसन्नता वाटते, असे उद्गार खोपोली येथील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक श्री. कुलदीपक रामदास शेंडे यांनी काढले. त्यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला १९ जून या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. दिलीप जाधव, तसेच खोपोली येथील उद्योजक श्री. रोहित शेंडे, श्री. सुशांत तेलवणे आणि श्री. जनार्दन जाधव हेही उपस्थित होते.

सनातनचे साधक श्री. राजेंद्र दिवेकर यांनी सर्वांना आश्रमातील सेवा आणि साधना यांविषयी अवगत केले. श्री. कुलदीपक शेंडे यांना सनातन संस्था निर्मित ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’  हे ग्रंथ भेट देण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. श्री. कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष : आश्रमात प्रत्येक ठिकाणी चंदनाचा सुगंध जाणवत होता.

२. श्री. दिलीप जाधव, माजी नगरसेवक : सनातन संस्था तरुण पिढीसाठी प्रेरणादायक कार्य करत आहे.

३. श्री. रोहित शेंडे, उद्योजक : जीवनात कसे वागायला पाहिजे ? हे सनातनच्या आश्रमात येऊन आत्मसात् करायला हवे.

४. श्री. सुशांत तेलवणे : आश्रमात येऊन पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या.

Leave a Comment