
धरुहेडा (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘ऋषि वर्ल्ड स्कूल’ या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याचा लाभ १ ली ते ५ वीपर्यंतच्या २६० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी ‘आदर्श बालक कसे बनावे ?, त्यासाठी काय करावे ?, राष्ट्र्रध्वजाचा मान कसा ठेवावा ?, आदर्श दिवाळी कशी साजरी करावी ?, हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस कसा साजरा करावा ?, ‘मम्मी-डॅडी’ ऐवजी आई-बाबा का म्हणावे ?’, यांविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बबिता शर्मा यांनी ‘अशी माहिती मोठ्या मुलांना देण्यासाठी परत या’, अशी विनंती केली.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !