दात घासण्यासाठी काय वापरावे
आणि काय वापरू नये ?

ब्रश करणे अर्थात दात घासणे ही नैमित्तिक कृती आहे. ‘ब्रश’ने दात घासणे आपल्या एवढ्या अंगवळणी पडले आहे की, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंतच्या म्हणजे सर्वांच्याच जीवनाचा जणू तो अविभाज्य घटकच झाला आहे ! यासंदर्भात आपला हिंदु धर्म काय सांगतो, हे जाणून घेतल्यास ‘नेमके कसे असावे’, हे आपल्याला लक्षात येईल. यादृष्टीने प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये, हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह पहाणार आहोत.

१. दंतधावन करण्यासाठी कडुनिंब, खदिर (खैर),
करंज, औदुंबर अशा वृक्षांचे काष्ठ (जाड काडी) वापरावे

१ अ. शास्त्र : ‘कडुनिंब, औदुंबर इत्यादींच्या काडीने दात घासल्याने दातावरील रजतमात्मक लहरींचे विघटन होऊन तोंडात शुद्ध वायूची उत्पत्ती होते. हा शुद्ध वायू देहाच्या पोकळीत हळूहळू संक्रमित होऊन देहातील पोकळ्यांना दिवसभर कार्य करण्यासाठी लागणारी उत्तेजना देण्यात यशस्वी होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२. दंतधावन करण्यासाठी गायीच्या शेणाच्या गोवर्‍या
जाळून बनवलेली राखुंडी किंवा तुरटीची भुकटी वापरावी

२ अ. शास्त्र : ‘दात हे प्राबल्यदर्शक पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या संयोगाने बनलेले असतात. अन्न खाण्याच्या प्रक्रियेतून दातांच्या फटीत जमलेले अन्नदर्शक घटक कालांतराने रजतमात्मकदर्शक टाकाऊ गंध निर्माण करतात. यामुळे तोंडाच्या पोकळीतील वायूमंडल अशुद्ध, म्हणजेच दूषित बनते.

१. राखुंडी : गायीच्या शेणाच्या गोवर्‍या जाळून बनवलेल्या भुकटीत तेजतत्त्वरूपी गंधदर्शक वायू दडलेला असल्याने या भुकटीच्या साहाय्याने दात घासल्याने भुकटीच्या मर्दनात्मक स्पर्शातून दातातील रज-तमात्मक लहरी आणि टाकाऊ गंधदर्शक लहरी यांचे तोंडातील पोकळीतच विघटन होऊन पोकळीची शुद्धता राखण्यास साहाय्य होते. दात घासल्यानंतर पाण्याने खळखळून चूळ भरल्याने राहिलेल्या आणि उच्चाटनात्मक प्रक्रियेत असलेल्या रजतमात्मक लहरी अन् वायू पाण्यात विसर्जित होऊन तोंडाची पोकळी पूर्णतः शुद्ध होते.

२. तुरटी : तुरटीत घर्षणात्मक तेजतत्त्वाशी संबंधित प्रवाही गंधदर्शक वायू दडलेला असतो. तुरटीच्या स्पर्शाने दातांसह तोंडाच्या पोकळीतील रज-तमात्मक लहरी अन् टाकाऊ वायूंचे एकत्रितरीत्या घनीकरण होण्यास साहाय्य होते. हे तेजाच्या स्तरावर झालेले आणि थोड्याफार प्रमाणात रज-तमात्मक लहरींची विघटनात्मक प्रक्रिया दर्शवणारे घनीकरणात्मक वायूमंडल चूळ भरण्याने पाण्यात एकत्रितरीत्या विसर्जित होते. अशा पद्धतीने दातांसह तोंडाची पोकळी शुद्ध होण्यास साहाय्य होते. शेणाच्या गोवर्‍या जाळून केलेली राखुंडी तुरटीपेक्षा जास्त लाभदायक आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१२.२००७, दुपारी ३.०३)

३. त्रिदोष आणि त्रिगुण यांनुसार दात घासण्यासाठी काष्ठ, राखुंडी किंवा तुरटी वापरावी

संकलक : काष्ठ, राखुंडी आणि तुरटी यांनी दात घासावेत, असे सांगितले आहे. प्रतिदिन निरनिराळ्या घटकांनी दात घासावेत का ?

एक विद्वान : नाही. प्रकृतीप्रमाणे तो तो घटक दात घासण्यासाठी वापरावा.

अ. त्रिदोष : वात, कफ आणि पित्त या प्रवृत्तीच्या जिवांनी अनुक्रमे काष्ठ, राखुंडी आणि तुरटी वापरणे लाभदायक असते. (टीप १)

आ. त्रिगुण : तत्त्वाच्या भाषेत सत्त्वगुणी जिवांनी काष्ठाने, रजोगुणी जिवांनी राखुंडीने, तर तमोगुणी जिवांनी तुरटी वापरणे योग्य असते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.१२.२००७, सायं. ६.५८)

४. दंतधावन करण्यासाठी विविध आयुर्वेदिक औषधी एकत्र करून बनवलेले दंतमंजन वापरावे

सनातनने आयुर्वेदिक औषधींपासून दंतमंजन बनवले आहे. या दंतमंजनाविषयी सविस्तर विवरण जाणून घेण्यासाठी ‘सनातन दंतमंजन’ हा लेख वाचावा. यासाठी यावर ‘क्लिक’ करा !

५. दंतधावनाच्या विविध पद्धतींची तुलना

 

दात घासण्याचा ब्रश

रासायनिक पेस्ट (टीप १)

तुरटी

राखुंडी

१.‘तत्त्व पृथ्वी पृथ्वी-आप घर्षणात्मक कनिष्ठ
तेज-पृथ्वी
तेजधारणेचे प्राबल्य अल्प-पृथ्वी
२. कार्य अल्प कालावधीत
स्थूल स्तरावर दात
स्वच्छ होणे
अल्प कालावधीत दातांना
कृत्रिम चमक येणे
दातांना चमक येणे दातांवरील अंगीभूत नैसर्गिक
आवरणाला बळकटी येणे
३. लाभ दातांच्या पोकळ्यांतील
स्थूल अन्नघटक
स्वच्छ होणे
तोंडात कृत्रिम सुगंध निर्माण
होऊन तात्पुरते चांगले वाटणे
बाह्यतः दातांवर
संरक्षककवच निर्माण
झाल्याने अन्नचर्वणातून
होणार्‍या रज-तमात्मक
लहरींच्या दातांवरील
आघातापासून दातांचे
रक्षण झाल्यानेदातांची झीज अल्प होणे
दोन दातांच्या पोकळीतील
वायूमंडल शुद्ध बनल्यानेदात खाली उतरण्याचीशक्यता अल्प होणे

आणि अन्न चावतांनाच
काही प्रमाणात अन्नातील
रज-तम कण दातांच्या
पोकळीतील वायूमंडलातील
लहरींच्या घर्षणाने

नष्ट होणे

अ. लाभ
टिकण्याचा
कालावधी
५ मिनिटे १५ मिनिटे अर्धा तास १ घंटा
४. दुष्परिणाम टीप २ टीप ३ कालांतराने दात
शिवशिवण्याचा त्रास होऊ शकणे
कालांतराने दातांच्या फटींत काळ्या कणांचा पातळ थर
निर्माण होणे
५. परिणाम स्थूल अन्नघटक
दाताच्या पोकळीतून
स्वच्छ झाल्याने तोंडात
अन्नकण कुजण्याच्या
प्रक्रियेपासून जिवाला
दूर रहाता येणे
तोंडात अन्नघटकांच्या
कुजण्याच्या प्रक्रियेचा परिणाम
म्हणून निर्माण झालेला दुर्गंध
तात्पुरता दबला जाणे; परंतु तो
नष्ट न होणे
१. दातांवरील स्थूल
दुर्गंधदर्शक कण नष्ट होणे२. दातांवर बाह्यतः कनिष्ठ
तेज-पृथ्वीदर्शक लहरींचे
कवच बनणे
१. तोंडातील पोकळीत साठलेला
दुर्गंधीयुक्त वायू मर्यादित
काळापुरता नष्ट होणे२. दातावर, तसेच दोन दातांच्या
पोकळीत सूक्ष्म तेज-पृथ्वीदर्शक
लहरींचे मंडल बनणे
६. वाईट शक्तींच्या
आक्रमणातील
शक्तीचा स्तर
कनिष्ठ इच्छा मध्यम इच्छा इच्छा इच्छा-क्रिया
७. वाईट शक्तींच्या
आक्रमणाच्या
स्तरावर होणारा
परिणाम
तोंडाच्या पोकळीवर
आक्रमण करण्याचे
प्रमाण वाढणे
दातांवर आक्रमण करण्याचे
प्रमाण वाढणे
तोंडातील
सूक्ष्म-यंत्रांची (टीप ४)
शक्ती न्यून होणे
दातांच्या पोकळ्यांत बसवलेले
सूक्ष्म काळे तंतू नष्ट होणे
८. प्रत्यक्ष वाईट
शक्तीशी संबंधित
कृतीवर होणारा
परिणाम
रागाने दात-ओठ
खाण्याचे प्रमाण वाढणे
दात शिवशिवल्याने दात
एकावर एक आपटण्याचे
प्रमाण वाढणे
मोठ्याने तोंडाचा ध्वनी
करत अन्न ग्रहण करण्याचे
प्रमाण न्यून होणे
झोपेत दात खाण्याचे प्रमाण
न्यून होणे

 

टीप १ – रासायनिक घटकांपासून बनवलेली दंतलेपी (पेस्ट)

टीप २ –

अ. ब्रश लागून हिरड्या आणि दात यांतून रक्त येणे, या रक्ताचा वापर करून वाईट शक्तींना तोंडाच्या पोकळीत आक्रमण
करणे सोपे जाणे आणि ‘दात स्वच्छ झाले’, असे वाटले, तरी सूक्ष्मातून ही क्रिया रज-तमात्मक स्तरावर तोंडात दूषित वायूमंडल निर्माण करणारी असणे

आ. दातांवर होणार्‍या घर्षणातून त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होणे, दातांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण निर्माण होणे आणि
तोंडाच्या पोकळीत त्रासदायक नादस्पंदने घनीभूत होणे

टीप ३ –

अ. पेस्टमधील रासायनिक घटकांमुळे जीभ आणि तोंडातील आतील भाग अल्सर झाल्यासारखा दिसणे, तोंडात लाल चट्टे
येणे, जिभेला चरे पडणे आणि यांत वाईट शक्तींना स्थान बनवणे सोपे जाणे

आ. दातांवर कृत्रिम चमक येणे, दातांवर असलेले चेतनेशी संबंधित सूक्ष्म-आवरण नष्ट होणे, दातांची झीज लवकर होणे, दातांचे
आयुष्य न्यून होणे आणि दात शिवशिवणे

टीप ४ –

सूक्ष्म-यंत्र : अनिष्ट शक्तींनी निर्माण केलेला, त्रासदायक शक्तीचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारा सूक्ष्म त्रासदायक आकृतीबंध,
म्हणजे सूक्ष्म-यंत्र. हे शरिरात असते किंवा वातावरणात असते.

 

आयुर्वेदिक पेस्ट

आयुर्वेदिक दंतमंजन

दंतधावनाचे काष्ठ

१.तत्त्व अल्प तेज-आप मध्यम तेज-आप जास्त तेज-आप
२. कार्य दातांतील सूक्ष्म-दुर्गंधाचे विघटन होणे आणि दातांचे आयुष्य वाढणे दातांच्या अन् तोंडाच्या अंतर्यामी
होणार्‍या शुद्धतेमुळे वाणीतून ऊत्सर्जित
होणार्‍या लहरींतील शक्तीस्वरूपता
वाढणे
हिरड्यांतील चेतना जागृत होणे आणि तोंडाच्या पोकळीतील
टाकाऊ वायू नष्ट होणे
३. लाभ दातांच्या आतील भागात तेज-
आपतत्त्वयुक्त लहरींचे मंडल बनल्याने अन्नचर्वणकरत असतांनाच अन्नघटकांना होणार्‍या या लहरींच्या स्पर्शाने अन्न
सात्त्विक बनणे आणि अन्नातील
दुर्गंधीयुक्त वायू नष्ट केला जाणे
दातांतील पोकळ्यांचे आयुष्य वाढल्याने दातांतील चेतना जागृत राहून दात निरोगी रहाणे अन्नचर्वण प्रक्रियेतून प्रक्षेपित होणार्‍या दूषित रज-तमात्मक लहरींचे तोंडातील पोकळीत
साठलेल्या काष्ठाशी संबंधित
तेजयुक्त लहरींमुळे त्याच वेळी
विघटन झाल्याने जिवाकडून
शुद्ध अन्न ग्रहण केले जाणे
अ. लाभ टिकण्याचा
कालावधी
२ घंटे अडीच घंटे ३ घंटे
४. दुष्परिणाम नाही नाही नाही
५. परिणाम १. पेस्टमधून प्रक्षेपित होणार्‍या
आपतत्त्वाशी संबंधित लहरींमुळे तोंडातील
पोकळीतील चेतना जागृत होऊन ती
पेस्टमधील तेजाच्या प्राबल्याच्या स्तरावर
दातांच्या फटीत घनीभूत होते. यामुळे
दातांचे आयुष्य वाढण्यास साहाय्य होते.२. तोंडातील चेतना जागृत झाल्याने
अन्नकण चर्वणात कोणत्याही प्रकारची
बाधा न आल्याने अन्न पचनास सोपे जाणे
आणि त्यामुळे आरोग्य चांगले रहाणे
दंतमंजनातून प्रक्षेपित होणार्‍या
आप-तेजदायी वायूजन्य लहरींमुळे
दातांच्या, तसेच तोंडाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या रज-तमात्मक
लहरींचे उच्चाटन होणेदातांच्या पोकळ्यांत तेजदायी लहरींच्या संचाराने तोंडाच्या
पोकळीची शुद्धता सतत राखली
जाणे
दातांचे आयुष्य वाढणे आणि
दातांच्या पोकळ्यांतील रज-तमात्मक
सूक्ष्म-लहरी काष्ठातील तेजाने नष्ट होणेतोंडाच्या पोकळीत काष्ठातून प्रक्षेपित
होणार्‍या आपतत्त्वाच्या स्तरावरील
प्रवाही तेजदर्शक लहरींचे वायूमंडल
गतिमान अवस्थेत ठेवणे
६. वाईट शक्तींच्या
आक्रमणातील
इच्छा-क्रिया-ज्ञान
शक्तीचा स्तर
क्रिया-इच्छा शक्ती मध्यम क्रियाशक्ती वरिष्ठ क्रियाशक्ती
७. वाईट शक्तींच्या
आक्रमणाच्या
स्तरावर होणारा
परिणाम
तोेंडातील दुर्गंधीयुक्त वायू प्रक्षेपित
करणार्‍या स्थानांची शक्ती न्यून होणे
टीप ५ तोंडातील सूक्ष्म काळा वायू नष्ट होणे
८. प्रत्यक्ष वाईट
शक्तीशी संबंधित
कृतीवर होणारा
परिणाम
तोंडातून उत्सर्जित होणार्‍या टाकाऊ
वायूतून निर्माण होणार्‍या ध्वनीचे उच्चाटन केले गेल्याने घोरण्याचे आणि झोपेत
दातावर दात घासण्याचे प्रमाण उणावणे
तोंडातून उत्सर्जित होणार्‍या वायूतील दुर्गंध नष्ट होणे आणि तोंडाच्या पोकळीत हलकेपणा
जाणवणे
झोपेत तोंड उघडे रहाण्याचे प्रमाण
न्यून होणे’

 

टीप ५ – तोंडाच्या पोकळीत भ्रमण करणार्‍या नादमयी तेजदायी लहरींमुळे तोंडाच्या आणि अन्नाच्या माध्यमातून देहात संक्रमित होणार्‍या रज-तमात्मक लहरींपासून पिंडाचे रक्षण होणे आणि तोंडात बसवलेल्या नादजन्य यंत्रांची (गतिमान अवस्थेतील कार्यकारी काळ्या स्थानांना ‘नादजन्य यंत्र’ म्हटले जाते.) शक्ती न्यून होणे

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.१२.२००७, सायं. ६.४४ आणि २९.१२.२००७, दुपारी १.५६)

६. तेंदूच्या काठीने दात घासू नयेत.

६ अ. शास्त्र

‘तेंदूची काठी ही तमोगुणवर्धक असल्याने ती वापरणे निषिद्ध मानले आहे.’ – एक विद्वान(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.६.२००७, दुपारी १२.०६)

७. दात घासण्यापूर्वी दातवणाची प्रार्थना करणे

दातवणाची (दात घासण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांची) पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.

आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशून् वसूनि च ।

ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ।। – नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक २५

अर्थ : हे वनस्पते, तू आम्हाला आयुष्य, बल, यश, तेजस्विता, प्रजा, पशू, धन, ब्रह्म, प्रज्ञा (ग्रहणशक्ती) आणि मेधा (धारणाशक्ती) दे.

(दात घासण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या वनस्पतीप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून वनस्पतीतही देवत्व पहायला शिकवणारा महान हिंदु धर्म ! – संकलक)

टीप १ – ज्या वेळी प्रकृतीचा कोणताच दोष प्रधान नाही, असे लक्षात येईल, तेव्हा लेखात खाली असलेल्या सूत्र ५ : ‘दंतधावनाच्या विविध पद्धतींची तुलना’ यामध्ये दिलेल्या दातांच्या लक्षणांवरून काष्ठ, राखुंडी आणि तुरटी यांपैकी काय वापरावे, हे ठरवता येऊ शकेल.(मूळस्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment