सनातन दंतमंजन

आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक गुणांनी परिपूर्ण असे सनातन दंतमंजन !

१. सनातन दंतमंजन : औषधी उपयोग

अ. सनातन दंतमंजनाच्या नियमित वापराने हिरड्या आणि दात यांचा दुर्बलपणा दूर होऊन हिरड्या आणि दात बळकट होतात.

आ. हिरड्या सुजणे, त्यातून पू आणि रक्त येणे बंद होते.

इ. दात किडणे थांबून दातांचे आरोग्य सुधारते.

ई. दात मुळापासून घट्ट होतात.

२. सनातन दंतमंजनाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता

सनातन दंतमंजनाच्या संदर्भात सनातनच्या साधिका सौ. अंजली गाडगीळ यांनी केलेले ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण’ आणि त्या वेळी त्यांच्या मनात आलेले विचार पुढे दिले आहेत. त्यावरून सनातन दंतमंजनाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता लक्षात येईल.

२ अ. सनातन दंतमंजनाचे ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण’

१. ‘दंतमंजन पाहून प्रसन्न वाटणे

दंतमंजन पाहून सुगंधी उटण्याला पाहून जसे प्रसन्न वाटते, तसे प्रसन्न वाटले. देवत्व असलेल्या गोष्टीत दैवी सुगंधाचे प्रमाण जास्त असल्याने या सुगंधाचा स्पर्श थेट अंतर्मनाला होऊन ती वस्तू पाहून प्रसन्न वाटते.

२. दंतमंजन हातात घेतल्यावर हाताला थंडावा जाणवणे

दंतमंजन हातात घेतल्यावर हाताला थंडावा जाणवला. जो घटक ईश्वराच्या संकल्पशक्तीने निर्माण झालेला असतो, त्यात चैतन्य असल्याने त्याचा स्पर्श हाताला थंड जाणवतो.

२ आ. सनातन दंतमंजन वापरण्याने आलेली अनुभूती

आवडी-निवडीपेक्षा आचारधर्मानुसार सनातन दंतमंजनाने दात घासल्यामुळे सात्त्विकता ग्रहण होऊन आनंद मिळणे

‘मला लहानपणापासून ब्रशने दात घासण्याची सवय असल्यामुळे दंतमंजनाने दात घासणे आवडत नसे. काही दिवसांनंतर आचारधर्मानुसार दंतमंजनाने आणि बोटाने दात घासावेत, हे मला कळले. तेव्हापासून मी सनातन-निर्मित दंतमंजन घेऊन बोटाने दात घासण्यास आरंभ केला. स्वत:च्या आवडी-निवडीपेक्षा आचारधर्मानुसार कृती करून सात्त्विकता ग्रहण करणे महत्त्वाचे असल्याने काही दिवसांनी मला ही कृती करतांना आनंद मिळू लागला.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २००८)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment