प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगल भेट !

रामनाथी, १ जानेवारी (वार्ता.) – हळदीपूर (कर्नाटक) येथील श्रीकृष्णाश्रम मठ श्री संस्थानचे मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी मंगळवार, ३१ डिसेंबर या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी आश्रमातील विविध विभागात चालणार्या् राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी माहिती दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे भक्तही उपस्थित होते. प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी हे सध्या गोवा दौर्यावर आले आहेत.

 

आजच्या स्थितीला आवश्यक असेच कार्य सनातन संस्था करत आहे !

सनातनविषयी गौरवोद्गार काढतांना स्वामीजी म्हणाले, सनातन संस्थेचे कार्य आवडले. आताच्या स्थितीला आवश्यक असेच कार्य सनातन संस्था करत आहे.

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिल्यानंतर प.पू. श्री श्री
वामनाश्रम स्वामीजी यांनी आश्रमाचे कौतुक करून पूर्ण दिवस आश्रम पहाण्यासाठी वेळ देण्याची इच्छा दर्शवणे

३१.१२.२०१३ या दिवशी प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली. नंतर ते फोंडा, दुर्गाभाट येथील त्यांच्या आश्रमात गेले. तेथे रात्री त्यांची पूजादी कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतले आणि सांगितले, आज सनातन आश्रम बघितला. फार चांगला आहे; परंतु वेळेअभावी पूर्ण बघायला मिळाला नाही. तसा पूर्ण आश्रम बघायला एक पूर्ण दिवसच लागेल. मी पुढच्या वेळी आश्रमासाठी एक दिवस देणार आहे. त्यांनी त्यांच्या भक्तांनाही सांगितले, पुढच्या गोवा भेटीचे नियोजन करतांना एक दिवस सनातन आश्रमासाठी ठेवा. स्वामीजी पुढे म्हणाले, मी आश्रमात गेलो, तेव्हा १० मिनिटे थांबीन, असे म्हटले होते; परंतु प्रत्यक्षात १ घंटा थांबलो. १ घंटा कधी संपला, ते समजलेच नाही. – सौ. रेखा कोलवेकर, दुर्गाभाट, फोंडा, गोवा. (८.१.२०१४)

 

प्रवचन झाल्यावर प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजींनी
उपस्थित स्त्रियांना सनातनच्या सत्संगात जाण्यास आणि धर्मशास्त्र समजून घेण्यास सांगणे

स्वामीजींचे स्त्रियांसाठी प्रवचन झाल्यावर त्यांनी उपस्थित स्त्रियांना प्रश्‍न विचारला, तुम्हाला मठ आणि समाज यांसाठी काही करावे ?, असे वाटते का ? सर्वांनी होकार दिला. नंतर स्वामी म्हणाले, तुम्ही प्रथम दूरचित्रवाणी आणि त्यावरील मालिका पहाणे बंद करा अन् आध्यात्मिक ग्रंथ, तसेच संतचरित्रे वाचा. सत्संग घ्या. आपल्या घराजवळ एक सत्संग आणि एक बालसंस्कारवर्ग चालू करा. आम्ही सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे पुष्कळ चांगले आहे. उपस्थित स्त्रियांनी माझ्याकडे बोट दाखवून या सनातनमध्ये आहेत, असे सांगितल्यावर स्वामीजी मला म्हणाले, या स्त्रियांचा सत्संग घ्या. यांना कुंकू का लावायचे ?, बांगड्या का घालायच्या ? हे शास्त्र समजावून सांगा. ते पुढे स्त्रियांना उद्देशून म्हणाले, सनातनमध्ये पूर्वी काय झाले, तिकडे लक्ष देऊ नका. त्यांच्यातील गुण सर्वांनी शिकून घ्या. (प्रत्यक्षात ३१.१२.२०१३ या दिवशी सनातन संस्था आणि साधक निर्दोष सिद्ध झाले. हे स्वामीजींना ठाऊक नव्हते.) – सौ. रेखा कोलवेकर, दुर्गाभाट, फोंडा, गोवा. (८.१.२०१४)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment