गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी लावणारे भास्कराचार्य

प्राचीन काळातच विविध शोध लावून आधुनिक विज्ञानाला
मागे टाकणार्‍या आपल्या बुद्धीमंत पूर्वजांकडून स्फूर्ती घ्या !

Bhaskaracharya-scr

भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले. भास्कराचार्यांनी यौगिक गणित (कालवाचक गणित – वेदातील शब्द) लिहिले. नवीन ग्रहावर गेल्यासच माणसाला ते कळेल.

भास्कराचार्य (इ.स. १२ वे शतक) यांनी आपल्या सिद्धांतशिरोमणी या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाविषयी सांगितले आहे.

आकृष्टिशक्तिश्‍च मही तया यत् खस्थं गुरु स्वभिमुखं स्वशक्त्या ।
आकृष्यते तत् पततीव भाति समे समन्तात् क्व पतत्यंय खे ॥ – सिद्धांतशिरोमणी भुवनकोश ६

अर्थ : ही पृथ्वी तिच्या आकाशातील पदार्थ स्वतःच्या शक्तीने आपल्याकडे खेचून घेते. त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो; परंतु ग्रहमंडलामध्ये सर्वच जण एकमेकांना खेचत असल्याने कोणीही खाली पडत नाही.

भास्कराचार्यांचे पिता विश्‍वंभरभट्ट यांच्या जीवनात असाच प्रसंग आला होता. सातही व्याहृतींशी अनुसंधान करणारा कोन अवकाशात सिद्ध होत असतांना जर स्त्रीला गर्भधारणा झाली, तर जन्माला येणार्‍या मुलांना सात व्याहृतींचा भेद घ्यायचे शास्त्र कळेल, हे विश्‍वंभरभट्टांना कळले होते. त्यातून भट्ट भास्कर जन्माला आला. (यावरून ५ व्या शतकात जेव्हा ख्रिस्ताचे नामोनिशानही अस्तित्वात नव्हते, तेव्हा आपले पूर्वज सध्याच्या विज्ञानापेक्षा कितीतरी पटींनी अधिक प्रगत होते, हे लक्षात येईल ! – संपादक)

 

प्रजोत्पादनाच्या संदर्भात प्रगत
असलेले भारतीय वैदिक विज्ञान !

प्रजोत्पादन

अ. शुक्रजंतूंच्या आधुनिक विज्ञानाला न उलगडलेल्या कोड्याचे उत्तर ऋषींना ज्ञात होते.

आ. आमच्या पूर्वजांना सहस्रो वर्षांपूर्वी रेत स्वतःच स्वतःचे पोषण करत असते, हे ठाऊक होते आणि आजच्या प्रगत विज्ञानाला ते अजूनही सांगता येत नाही.

गर्भाशयाबाहेर कृत्रिम मानवी
पेशींची वाढ अर्थात क्रोमोसोमचे ज्ञान !

अ. विज्ञान ज्याला क्रोमोसोम म्हणते, त्याचे कार्य व्यासांना साडेसात सहस्र वर्षांपूर्वी ज्ञात होते आणि त्यांनी त्याला गुणविधी हे सार्थ नाव दिले.

आ. गांधारीला मूल होत नसल्याने व्यासांनी तिच्या गर्भातून स्वस्थ पेशी (नॉर्मल सेल्स) बाहेर काढून कुंभामध्ये ठेवल्या. त्या कुंभात घृत म्हणजे तेल देणारे पदार्थ घालून गर्भ सजीव केला. एवढा मोठा प्रयोग करायला क्रोमोसोमचे ज्ञान त्या काळी अवगत होते का ? याचे उत्तर होय असेच आहे. व्यासांनी क्रोमोसोमला गुणविधि म्हटले आहे. ते २३ असतात, हे व्यासांचे सांगणे आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे खरे आहे.

– वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १६० व १६१, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात