प्राचीन वैज्ञानिक आणि ऋषीमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास जाणा !
विज्ञान जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला
क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळणे
विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती. या क्वाँटम् सिद्धांताच्या आधारावरच सध्याचे आधुनिक रसायनशास्त्र, जीव-रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक आणि संगणक आहेत. (मासिक हिंदु व्हॉईस, मार्च २००६, पृष्ठ क्र. ११)
न्यूटनच्या आधी किमान १ सहस्र वर्षे गुरुत्वाकर्षणाची संकल्पना आद्य शंकराचार्यांनी मांडलेली असणे
प्रश्नोपनिषदातील एका मंत्रावर भाष्य करतांना आद्य शंकराचार्य म्हणतात, पृथ्वीच्या प्रख्यात देवतेने आपणास साहाय्य करून खाली ओढून धरले नसते, तर हे शरीर जड असल्यामुळे अंतरिक्षात कुठेही गेले असते किंवा पडले असते. वैदिक विज्ञानास धरूनच शंकराचार्यांनी भाष्य केले आहे. शंकराचार्यांचा काळ उशिरात उशिरा इ.स. ८०० मानलेला आहे. त्यामुळे न्यूटनच्या अगोदर किमान १ सहस्र वर्षे शंकराचार्य होऊन गेले आहेत. तरी आम्ही म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला !
संदर्भ : वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १८६, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक
ऊर्जा
आधुनिक विज्ञानाने शोध लावलेल्या विजेची सखोल माहिती सहस्रो वर्षांपूर्वीच्या अगस्तिसंहिता या ग्रंथात लिहिलेली आहे. यात पाण्यापासून वीज कशी निर्माण करावी, याचे वर्णन केलेले आहे.
पृथ्वी
पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती (स्वांग परिभ्रमण) बंद पडलेली होती आणि त्याचा उल्लेख ऋग्वेदातही आहे !
विष्णूचा सेवक असणार्या शेषनागाने पृथ्वीला धारण केल्याचे ऋषी-मुनींनी तपश्चर्या करून जाणून घेतलेले होते !
पृथ्वीच्या कक्षेबाहेर काळाचा
वेग मंदावतो, हे प्राचीन ऋषीमुनींना
माहीत असणे आणि विज्ञानाला आता समजणे
जेव्हा आपण पृथ्वीच्या आकर्षण शक्तीचा भेद करून आकाशात जातो, तेव्हा काळाची गती मंदावते. चंद्रावर एक वर्ष वास्तव्य करून आलेला माणूस आपणास त्याच शारीरिक अवस्थेत सापडतो. याचे कारण हेच आहे. शास्त्रज्ञांनी काळाचा वेग पृथ्वीच्या कक्षेबाहेर मंदावतो, हे मान्य केले आहे ! याला आपल्या महाभारतात प्रमाण आहे. महाभारतातील वर्णनाप्रमाणे रेवतीचा (बलरामपत्नी) पिता तिला घेऊन योग्य वरप्राप्तीच्या विचारविनिमयासाठी ब्रह्मलोकात जातो आणि परततो. तेव्हा पृथ्वीवर एक युग लोटलेले असते ! याचा अर्थ पृथ्वीच्या कक्षेबाहेर काळाचा वेग मंदावतोे. हे प्राचीन ऋषीमुनींनी योगशक्तीद्वारे जाणले होते.
– प.पू. दादाजी वैशंपायन (मासिक भाग्यनिर्णय)
सूर्य
१. सूर्य किती छोटा आहे, हे मुंडकोपनिषदात सात सहस्र वर्षांपूर्वीच लिहिलेले होते, तर आधुनिक विज्ञानाला आता समजले. विराट ब्रह्माग्नीची एक समिधा म्हणजे आपला सूर्य आहे, हे मुंडकोपनिषद २ / ५ येथे म्हटले.
हे आज विज्ञानास कळले आहे, जे मुंडकाला सात सहस्र वर्षांपूर्वीच कळले होते !
२. सूर्यमंडलातील प्रत्येक ग्रह आणि तारा साठ वर्षांनी पुन्हा त्याच्या मूळ स्थानावर येणे, प्रदक्षिणेचा काल पुन्हा त्याच गतीने चालू होणे आणि अनंत ब्रह्मांडातील गतीमान घटकाचे अचूक ज्ञान ऋषीमुनींना साधना किंवा ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ यांमुळे प्राप्त झाले.
गणित
पाश्चात्त्यांना फक्त १ सहस्रपर्यंतचे अंक
माहीत होते; मात्र हिंदूंना परार्धापर्यंतचे अंक ठाऊक आहेत !
शून्याची निर्मिती ही भारतियांनी जगाला दिलेली देणगी असणे आणि ऋषींनी गणितावर ग्रंथ लिहिलेले असणे
भारतीय ऋषींनी अंकशास्त्रावर सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि ज्योतिषशास्त्र यांत केलेला आढळतो. शून्याची निर्मिती ही भारतियांनी जगाला दिलेली देणगी आहे. प्राचीन आर्यभट्ट हे गणिती आणि ज्योतिर्विद होते. त्यानंतर भास्कराचार्यांनी सिद्धान्त शिरोमणी या ग्रंथाचे ४ विभाग केले – १. लीलावती २. बीजगणित ३. गणिताध्याय आणि ४. गोलाध्याय. यांपैकी लीलावती हा गणितावरील ग्रंथ जास्त लोकप्रिय आहे. पाचव्या-सहाव्या शतकातील प्रसिद्ध ज्योतिषी आणि गणितज्ञ वराहमिहिर यांच्या पंच सिद्धांतिका या ग्रंथात शून्याचे उल्लेख वारंवार येतात. अंकाची सुरुवातही ० ते ९ आहे. बाकी अंक यांचाच विस्तार आहे.
– प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४५)
ग्रह
सर्व ग्रह प्राथमिक अवस्थेत तप्त स्वरूपात असून कालांतराने थंड झाले, याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. त्याचा आधुनिक विज्ञानाने आता शोध लावला !
नक्षत्र
नक्षत्राचा शोध लावणारे तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी !
पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. अगणित तारकांपैकी केवळ अभिजित नक्षत्र तेवढेच इ.स. पूर्व १२ सहस्र वर्षे या काळी ढळले, हे आजच्या विज्ञानाला कळलेले ज्ञान सहस्रो वर्षांपूर्वी व्यासांनी महाभारतात सांगितलेले होते ! आधुनिक शास्त्रज्ञांनी आता मान्य केले की, त्या वेळी वेगा (म्हणजे अभिजित नक्षत्र) खरोखरीच ढळले होते आणि हा तारा उत्तर ध्रुव बनला होता.
प्राणीशास्त्र
अश्विनींनी एका भाकड आणि वांझ गायीमधून दूध उत्पन्न करणे
ऋग्वेद १-११६-२२ नुसार अश्विनींनी एका भाकड, वांझ गायीमधून दूध उत्पन्न केले. जी गाय दूध देण्यास समर्थ नव्हती, ती अश्विनींच्या उपचारामुळे दूध देऊ लागली. असा वैज्ञानिक चमत्कार आजचे विज्ञान करू शकलेले नाही. (वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १२०, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)
ऋभूऋषींनी पुष्कळ दूध देणारी गाय उत्पन्न करणे
ऋभूऋषींनी पुष्कळ दूध देणारी गाय उत्पन्न केली. हा जेनेटिक इंजिनियरींगचा पहिला प्रयोग असावा. (वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १२६ व १२९, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)
अश्विनींनी अंधांना दृष्टी देणे आणि बहिर्याला श्रवणशक्ती देणे
ऋग्वेद १-११६-१४ व १६ नुसार अश्विनींनी दोन अंध जनांना पुन्हा दृष्टी दिली, असे सांगितले आहे. १६व्या ऋचेतील एक अंध ऋज्राश्व नामक राजकुमार होता. त्याचा पिता वृषागिर यानेच त्याचे डोळे फोडले होते, ते अश्विनींनी पुन्हा सुधारले. ऋग्वेद १-११७-१७ नुसार अश्विनींनी अंध कण्वास डोळे दिले आणि नार्षदाला श्रवणशक्ती दिली. (वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १२० डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)
पर्जन्यशास्त्र

आधुनिक विज्ञानाने छायाचित्रित केलेल्या
तेजोमेघांचे वर्णन सहस्रो वर्षांपूर्वींच्या ऋग्वेदात असणे
- फलनिष्पत्ती चांगली होती, हे आताही प्रयोगान्ती सिद्ध होत आहे.
- शक्तींना सतत केलेल्या यज्ञांतून हविर्भाग देऊन संतुष्ट राखल्याने त्यांनी सृष्टीसंचालनाचे आपापले कार्य उत्तम प्रकारे पार पाडत असे !
- सहस्र वर्षार्ंपूर्वीच्या महाभारतात पर्जन्यास्त्र, आग्नेयास्त्र यांचा उल्लेख आहे.
- बारा वर्षे दुष्काळ पाडणार्या शस्त्रांचा उल्लेख महाभारतात केला आहे.
- गर्भाचा नाश करणार्या अस्त्रांचा निर्देश महाभारतात आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.२.२००९)