सर्वांना विनंती !
‘५०० वर्षांच्या अथक संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामांचे मंदिर निर्माण झाले आहे. आता आपले पुढील ध्येय आहे ‘रामराज्य’ स्थापन करणे ! रामराज्याचे व्यापक ध्येय साकारण्यासाठी आपल्याला साक्षात् प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष रामराज्य साकारण्यापूर्वी ते आपल्या अंतरात निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘रामराज्य’ साकार होईपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करण्याची दिशा आपल्याला दिली आहे.
श्री गुरूंच्या संकल्पाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी आणि श्रीरामतत्त्वाची ऊर्जा समष्टी स्तरावर कार्यरत होण्यासाठी २६ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करावे. ‘रामराज्य’ स्थापन व्हावे, अशी मनोकामना असणार्या धर्मनिष्ठ हिंदूंनी परिसरातील मंदिरामध्ये एकत्र येऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप सामूहिकरित्या करावा, असे या अभियानाचे स्वरूप आहे. विविध आध्यात्मिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, वाचक आणि हितचिंतक यांनीही आपल्या परिसरात ‘रामनाम संकीर्तन’ अभियान आयोजित करावे.
१. अभियान कसे राबवता येईल ?
अ. जिल्हास्तरावर धर्मप्रेमी, सत्संगातील जिज्ञासू, युवा साधना सत्संगातील युवा, हिंदु जनजागृती समितीच्या शाखा इत्यादींच्या माध्यमातून हे अभियान व्यापक स्तरावर राबवता येईल.
आ. सामूहिक नामजप लयबद्ध व्हावा, यासाठी नामजपाच्या ठिकाणी सहभागी भाविकांना ऐकता येईल अशा आवाजात नामजपाचा ‘ऑडिओ’ लावावा. हा ‘ऑडिओ’ https://www.sanatan.org/mr/audio-gallery या ठिकाणी विनामूल्य उपलब्ध आहे.
इ. या अभियानाचा ‘सोशल मिडिया’वरूनही (सामाजिक माध्यमांवरूनही) प्रसार करण्यात येणार आहे.
ई. अभियान झाल्यावर त्याचे वृत्त छायाचित्र आणि व्हिडिओ यांसह ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात, तसेच स्थानिक वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्या यांना पाठवावे.
२. रामनाम संकीर्तनाचे स्वरूप
रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे
श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे
हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे
रामराज्यासाठी प्रार्थना
‘‘हे प्रभु रामराया, श्रीराम मंदिराची समस्त हिंदूंची इच्छा आपण पूर्ण केलीत, आता आम्ही रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा करत आहोत. रामराज्य निर्मितीचे अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेचे भगवद्कार्य करण्यासाठी तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव असू दे. रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आम्हा सर्वांना भक्ती, शक्ती आणि बुद्धी दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’’
श्रीरामनामाचा जप
श्रीरामाचा नामजप ऐकण्यासाठी येथे क्लिक करा – > Sanatan.org/mr/audio-gallery
रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा
१. माझी माझ्या रामारायावर आणि माझ्या धर्मावर श्रद्धा आहे. माझ्या धर्मश्रद्धा जोपासण्याचा, धर्मानुसार आचरण करण्याचा मला जन्मसिद्ध अधिकार आहे.
२. प्रभु श्रीरामाच्या कृपेमुळे भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती झाली, तशीच आमच्या मनामध्येही श्रीरामाच्या भक्तीचे मंदिर निर्मिण्यासाठी मी प्रयत्न करीन अर्थात निरंतर श्रीरामभक्ती करीन.
३. हिंदु संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांचे जतन-संवर्धन-आचरण आणि प्रसार मी स्वतः करीन, तसेच त्याविषयी माझ्या धर्मबांधवांमध्येही जागृती करीन.
४. हे रामराया, तू जसे धर्माचे रक्षण केलेस, तसे हिंदु धर्म, वेदादी धर्मग्रंथ, देवळे, गोमाता आणि स्त्रिया यांचे रक्षण करणे, हे माझे परमकर्तव्य आहे, असे मानून यांवर होणारे आघात रोखण्यासाठी मी प्राणपणाने प्रयत्न करीन.
५. ५०० वर्षे अतिक्रमित श्रीरामजन्मभूमी जशी मुक्त झाली, त्याचप्रकारे माझ्या पुण्य भारतभूमीवर वसलेल्या अन् आक्रमकांनी नष्ट केलेल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यासाठी मी प्रयत्न करीन.
६. ‘धर्मनिरपेक्ष’ भारताला पुन्हा ‘रामराज्य’ अर्थात ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ बनवणे आणि आदर्श-सुखी समृद्ध-संपन्न-सुरक्षित-सुसज्ज बनवणे, हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल. यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहीन !
बांधवांनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाच्या माध्यमातून आपल्या अंत:करणात आणि पुढे जाऊन संपूर्ण विश्वात रामराज्य निर्माण करण्याची पावन संधी ईश्वरी कृपेने प्राप्त झाली आहे, या संधीचा लाभ घेऊन ईश्वराची कृपा संपादन करा !’
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला