व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून (मृत्यूकुंडलीवरून) तिला ‘मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकणे आणि तिच्या चांगल्या-वाईट कर्मांचा बोध होणे

‘जिवाचा जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. जन्मकुंडलीवरून जिवाला या जन्मात भोगावयाच्या प्रारब्धाची तीव्रता आणि प्रारब्धाचे स्वरूप यांचा बोध होतो. जिवाच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकते. याला ‘मृत्यूकुंडली’ म्हणता येईल.

यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची धर्मशाळा या दोन ठिकाणी २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने यज्ञाच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले.

कर्मस्थान – मनुष्यजन्माचे सार्थक करणारे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान !

परमेश्वर प्रत्येक जिवाला त्याच्या कर्मानुसार न्याय देतो. त्यामुळे मानवाकडून होणा-या प्रत्येक अपराधानुसार त्याला दंड मिळतो आणि हा दंड त्याला भोगूनच संपवावा लागतो. केवळ मनुष्य प्राण्यालाच बुद्धीने कुंडलीच्या माध्यमातून कर्माविषयी जाणून घेता येते, तसेच योग्य कर्म करून जन्माचे सार्थक (मोक्षप्राप्ती) करून घेणे शक्य होते.

कुंडलीतील रवि-मंगळ युती योग

रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक युती योग, केंद्र योग किंवा प्रतियोग असेल, तर अशा व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात धाडसी आणि पराक्रमी असल्याचे दिसते. रवि आणि मंगळ या ग्रहांमधील युती योग वेगवेगळ्या राशीतून आणि स्थानातून वेगवेगळी फळे देतात.

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.

‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

धनुर्मासाचे माहात्म्य

१६.१२.२०२० ते १३.१.२०२१ या कालावधीत धनुर्मास आहे. या मासाचे पाच गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत महत्त्वाचे असतात. चंद्राच्या संक्रांतीचे आधिक्य असणार्‍या या मासात भगवंताची आराधना, भगवंताचा नामजप, भगवत्कथा श्रवण, व्रत, दान, दीपदान, सत्संग आणि निष्काम कर्म करणे यांचे विशेष माहात्म्य आहे.

ग्रहदोषांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय

ग्रहदोष म्हणजे कुंडलीतील ग्रहांची अशुभ स्थिती. कुंडलीतील एखादा ग्रह दूषित असल्यास त्या ग्रहाची अशुभ फळे व्यक्तीला प्राप्त होतात,

भगवान कार्तिकेयाचे स्वरूप असणारे तेजस्वी नक्षत्र : कृत्तिका !

​भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो.

हिंदु धर्म सर्वांना जोडतो, तर ‘रिलीजन’ एकमेकांशी संबंध तोडतो !

‘युरोप आणि अमेरिका इत्यादी पाश्‍चात्त्य देशांमध्ये ‘धर्म’ अशी कोणतीही संकल्पना नाही. तेथे ‘रिलीजन’ आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद ‘रिलीजन’ असा केला