मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी सनातनचा दृष्टीकोन

सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाज एकत्रित येऊन भव्य मोर्चे काढत आहे. मराठा समाज हिंदु समाजाचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे या माध्यमातून हिंदु समाजाचेच एक प्रकारे संघटन होत आहे, अशी सनातनची एकप्रकारे धारणा आहे..

मंगळुरू (कर्नाटक) येथे सात दिवसीय राज्यस्तरीय शिबीर भावपूर्ण वातावरणात संपन्न

साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि विहंगम धर्मप्रसार व्हावा, याकरता १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत येथे साधनावृद्धी आणि विहंगम धर्मप्रसार हे ७ दिवसीय राज्यस्तरीय शिबीर उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.

बलुची मुसलमान करतात हिंगलाज मातेची पूजा !

बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलुच लोकांनी प्राणपणाने या मंदिराचे रक्षण केले आहे.

श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.

जय जवान गणेशोत्सव मंडळात धर्मशिक्षण आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सप्रदर्शन !

६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ६०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप साळोखे यांनी प्रदर्शन पाहून अन्य गोष्टींना फाटा देऊन एक चांगला उपक्रम राबवल्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !

कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.

परकियांनी विशद केलेले भारताचे अनन्यसाधारण महत्त्व !

बिल ड्युरांट म्हणतो, हिंदुस्थान ही आपल्या वंशाची मातृभूमी आणि संस्कृत ही युरोपीय भाषांची जननी आहे. ती आपल्या तत्त्वज्ञानाची जननी आहे.

मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक ! – अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

या वेळी बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस म्हणाल्या, हिंदु धर्मात सांगण्यात आलेल्या प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. या शास्त्राचे पालन करणे म्हणजेच धर्माचरण होय !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम ‘!

१० सप्टेंबर या दिवशी येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या टाक्यांवर (बॅरलवर) फळी बसवून (होडीसारखे) प्लॅटफॉर्म बनवले होते.

गणेशोत्सव पारंपरिकपणेच साजरा व्हावा !

धान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा आहे. देवाचे पावित्र्य मूर्तीत आहे, अशा बनावट गोष्टींत नाही. देवाला अगदी खेळणे बनवू नका, हे सांगायला लागणे दुर्दैवाचे आहे.