
प्रयागराज (कुंभनगरी) – सध्या मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व कायदे केवळ हिंदूंसाठी आहे. त्यांच्यासाठी कायदे नाहीत, अशी स्थिती भारतात आहे. आता आपल्याला कृष्णनीती वापरून जनतेला जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन हरिद्वार येथील कनखल मधील श्री पंचायती निर्मला आखाड्याचे श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला.
महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराजे पुढे म्हणाले की, सनातन संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे. ही संस्कृती आपली वैदिक सनातन संस्कृती आहे. या प्रदर्शनातून सनातन धर्माची माहिती सर्वसामान्यांना सहज समजेल, अशी आहे. आम्ही निर्मल आखाड्याच्या अध्यक्षतेखाली पाच प्रदेशांत हिंदु जनजागृती यात्रा काढल्या आहेत. आम्हीही २५ वर्षांपासून हेच कार्य करत असल्याने मी तुमच्या समवेत आहे.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...
महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र...