सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील माहितीचा अभ्यास करून हिंदू धर्माचरण करतील ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर माँ सतीगिरीजी

कुंभमेळा प्रयागराज २०१९

माँ सतीगिरीजी महाराज यांच्याशी संवाद साधतांना (डावीकडे) पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून समाजाला उपयुक्त अशी माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या काळात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे समाज अनुकरण करत आहे. त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली संस्कृती आणि धर्म यांचा प्रचार करणे आवश्यक आहे. सनातनचे प्रदर्शन पाहून हिंदू प्रतिदिन प्रदर्शनातील माहितीचे म्हणजे आपल्या हिंदु धर्मातील सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण करून धर्माचरण करतील, असे मला वाटते. समाजाला धर्माचरण करण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे आणि हेच कार्य सनातन संस्था करत असल्याचे पाहून मला पुष्कळ आनंद झाला, असे मार्गदर्शन हरिद्वार येथील त्रिलोकीनाथ विश्‍व सेवा संस्थान आणि १०८ फिट दुर्गा मूर्ती आश्रमाच्या श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर माँ सतीगिरीजी यांनी ११ फेब्रुवारीला येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्या बोलत होत्या. सनातनच्या साधिका कु. कृतिका खत्री यांनी माँ सतीगिरीजी यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली, तसेच त्यांचा सन्मान करून त्यांना हिंदु जनजागृती पुरस्कृत ‘देवनदी गंगाकी रक्षा करे’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी माँ सतीगिरीजी यांच्याशी ‘राष्ट्र आणि धर्म’ यांविषयी संवाद साधला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment