‘सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले’ – पंडित कैलाशचंद शर्मा

पंडित कैलाशचंद शर्मा (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (डावीकडे)

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले. धर्मकार्याशिवाय आणखी दुसरे चांगले कार्य असू शकत नाही. धर्म वाचवण्यासाठी केल्या जाणार्‍या कार्यापेक्षा मोठे धर्मकार्य होऊ शकत नाही. आपण यज्ञ, पूजा, पाठ यांसह इतर धार्मिक कार्य करत असतो; मात्र धर्म असल्याशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. धर्माचे आपण शाश्‍वत रक्षण केल्यानंतर धर्म आणि कार्य यशस्वी होऊ शकते. नुसत्या परंपरेने कार्य होत नाही, असे प्रतिपादन बुलंद (उत्तरप्रदेश) येथील पंडित कैलाशचंद शर्मा यांनी येथे ६ फेब्रुवारीला काढले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ‘ग्रंथ आणि धर्मशिक्षण’ फलक प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर पंडित शर्मा बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत सर्वश्री महेश शर्मा, पवनकुमार शर्मा आणि रामकिशोर शर्मा उपस्थित होते. या सर्वांशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘राष्ट्र आणि धर्म’ कार्याविषयी चर्चा केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment