हरिद्वार येथील भारतमाता मंदिराचे श्री ललितानंदगिरीजी महाराज यांनी प्रयागराज येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था हिंदूंना जागृत करण्याचे कार्य करत आहे. ‘सनातन’चा अर्थ आहे, प्राचीन. तुम्ही प्राचीन परंपरेला जागृत करत आहात. मनुष्याच्या अंधकाराला तुम्ही दूर करत आहात, त्यामुळे मी पुष्कळ प्रसन्न आहे. परमपिता प्रयाग कुंभच्या निमित्ताने आपल्यासाठी मी मंगल कामना करतो. परमपिता परमात्म्याला प्रार्थना करतो की, जो संकल्प घेऊन आपण चालला आहात, त्या संकल्पाला परमपिता परमात्मा पूर्ण करेल. तशी तो तुम्हाला शक्ती देईल. माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो.’’