तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !
तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ पूर्वेकडील बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टींवर धडकण्याची चेतावणी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. बंगालमध्ये २५ मे या दिवशी, तर ओडिशामध्ये २६ मे या दिवशी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.