कर्नाटकमधील कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांची भविष्यवाणी !

सुनामी, भूकंप यांमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होईल !

स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या होतील !

श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री

हासन (कर्नाटक) – कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे. लोक कोट्यवधी लोक रस्त्यावर रक्ताच्या उलट्या करून मरतील. तसेच स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या होतील, अशी भविष्यवाणी कोडी मठाचे श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांनी केली आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री यांनी आतापर्यंत केलेली भविष्यवाणी खोटी ठरलेली नाही, असे सांगितले जाते. २ वर्षांपूर्वीच त्यांनी औषध नसलेले आजार येणार असल्याचे म्हटले होते.

श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र श्री पुढे म्हणाले की, कार्तिक मासापर्यंत पाऊस पडणार आहे. हिवाळाही अधिक थंड असेल आणि तो आजारांना पूरक असणार आहे. आश्‍विन मासामध्ये अधिक धोकादायक अशा घटना घडणार आहेत. त्या वेळी सामूहिक मृत्यूसमवेत मोठ मोठ्या व्यक्तींच्या हत्या होतील. सुनामी, भूकंप आदी अनेक नैसिर्गिक आपत्ती येतील. यात लाखो लोक मरतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment