अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !
एक महाकाय हिमनग वितळला आहे. हा हिमनग स्पेनच्या माजोरका बेटाच्या आकाराइतका आहे. उपग्रह आणि विमान यांद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून हे दृश्य दिसून आले. हा जगातील आतापर्यंतचा सर्वांत महाकाय बर्फाचा तुकडा आहे, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अँटार्क्टिकामधील बर्फाचा एक मोठा तुकडा वितळला होता.