सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक’ महासन्मान !

श्री. नीलेश नागरे

नगर – अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ अन् विश्‍वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१’ने सन्मानित करण्यात आले. नाशिक झोनमध्ये नगर मंडळ कार्यालयांतर्गत श्रीरामपूर विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून श्री. नीलेश नागरे कार्यरत आहेत.

कोविडच्या काळामध्ये त्यांनी नगर मंडळ कार्यालय अंतर्गत आणि औरंगाबाद परिमंडळ कार्यालय अंतर्गत, ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘गूगल मीट’, ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स झूम अ‍ॅप’ या माध्यमातून ‘कोविड १९’ हा विषय घेऊन अभियंते, जनमित्र, बिलिंग स्टाफ, यंत्रचालक, आऊटसोर्स या सर्वांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण केली. श्रीरामपूरमध्ये थकबाकी वसुली करत असतांना श्री. नागरे यांनी पाणी पाजून काही चिमण्यांचे प्राण वाचवले होते. यादृष्टीने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, असे निवड समितीने सांगितले.

श्री. नीलेश नागरे यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्व श्रेय परमेश्‍वर, गुरु, तसेच महावितरण आस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी यांना दिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment