आपत्काळात पेट्रोल, डिझेल आदी इंधनांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने सायकलचा पर्याय निवडा !

साधकांसाठी सूचना, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे. अन्य वाहनांमुळे वायू, तसेच ध्वनी प्रदूषण होते; पण सायकल चालवल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे सायकल पर्यावरणपूरक आहे.

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील. संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता ज्यांच्याकडे सायकल आहे, त्यांनी ‘ती वापरण्यायोग्य स्थितीत आहे का ?’, हे पहावे. सायकल नादुरुस्त असल्यास ती दुरुस्त करावी. सायकल दुरुस्त करायला येत नसल्यास दुरुस्ती करणे शिकून घ्यावे. सायकलचे चांगल्या गुणवत्तेचे आणि टिकाऊ सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) आताच खरेदी करून ठेवावेत. जेणेकरून भविष्यात सायकल नादुरुस्त झाल्यास ती घरच्या घरीही दुरुस्त करता येईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment