जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, तसेच ‘योग आणि संगीतोपचार’ विषयांतील तज्ञ वैद्य बालाजी तांबे यांचे निधन !

पाच दशके त्यांनी ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रचार अन् प्रसार केला. त्यांनी समाजातील अनेक घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देश यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात त्याचा प्रसार केला

हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे भारतात पूरस्थिती निर्माण होणार ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.

जमशेदपूर (झारखंड) येथे वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

या प्रसंगी मंदिराचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजन गोराई म्हणाले, ‘‘वृक्षारोपणासारखे महान कार्य अन्य प्रतिष्ठित लोकांकडून करण्यापेक्षा सनातनच्या साधकांकडूनच करावे, असे मला वाटले.’’

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’

चिपळूणचा महापूर आपत्काळाच्या दाहकतेची झलक !

पुरात अडकलेल्या आणि जिवावर बेतलेल्या कुणालाही प्रशिक्षित यंत्रणेकडून साहाय्य मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्यालाच आपल्या जीवितरक्षणासाठी झगडावे लागणार असून त्यासाठी स्वतःचे मनोबल आणि आत्मबळ अन् ईश्वरावरील श्रद्धा, हेच एकमात्र साधन आहे.

एखाद्या वस्तूवर जलद गतीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची पद्धत

‘एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करण्यासाठीही त्या वस्तूच्या काठासमोरून मुठीने आवरण काढल्यास त्या वस्तूवरील आवरणही लवकर निघून जाते. त्यानंतर त्या वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय केल्यावर तिच्यामध्ये लवकर चांगली स्पंदने येतात.’

‘कोरोना महामारीच्या कठीण काळात समाजातील व्यक्तींना प्रेमाने आधार देणे’, ही समष्टी साधनाच असणे

कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक यांना कोरोना झाल्याचे समजल्यावर कुटुंबातील अन्य सदस्यांना काळजी वाटते. रुग्णाला ‘तू नक्की बरा होशील. देव तुझ्या पाठीशी आहे. तू देवाचे नाव घे. काहीही साहाय्य लागले, तर आम्ही करू’, असा प्रेमाचा आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे’, असे लक्षात आले.

भक्तांद्वारे मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन पहाणारे शिवशंकर पाटील यांचा आदर्श सर्वच मंदिर विश्वस्तांनी घ्यावा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

कथित गैरव्यवस्थापनाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक मोठी मंदिरे स्वतःच्या नियंत्रणात घेतली. अनेक मंदिरांतील भक्तांचे विश्वस्त मंडळ विसर्जित केले. त्या वेळी भक्तांच्या माध्यमांतून सचोटीने कार्य करून मंदिर व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळून मंदिर सरकारीकरणाला पर्याय निर्माण करणारे शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी सर्व हिंदू आणि मंदिर विश्वस्त यांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.

ढगफुटी म्हणजे काय ? आणि ती कशी होते ?

गडगडाटी आणि वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा ‘लॅटिन’ शब्द आहे. ‘क्युम्युलस’ म्हणजे एकत्र होत जाणारे आणि ‘निम्बस’ म्हणजे ढग. थोडक्यात झपाट्याने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग हा प्रारंभ असतो.