संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

‘सनातन पंचांग २०२२’मध्ये राजमाता जिजाऊंचा तिथीनुसार १७ जानेवारी २०२२ असा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख योग्य असतांना जाणीवपूर्वक ‘तो दिनांकानुसार १२ जानेवारी २०२२ असा हवा’, असा कागांवा करत मराठा सेवा संघ, तसेच संभाजी ब्रिगेड पुरस्कृत फेसबूक पृष्ठांवर सनातनविषयी अपप्रचार आणि चिथावणीखोर पोस्ट करण्यात आल्या आहेत.

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे. भारतमातेला वाचवायचे असल्यास हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

२० आणि २१ नोव्हेंबर या दिवशी चिंचवड (पुणे) आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘साधना सत्संगा’मध्ये नियमित सहभागी होणार्‍या जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्याला ३५० हून अधिक जिज्ञासू ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

कार्तिक अमावास्या, म्हणजे ४.१२.२०२१ या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण

‘शनिवार, कार्तिक अमावास्या (४.१२.२०२१) या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.

सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

 ‘सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा आहे. सनातन धर्माचे वैज्ञानिक कार्य सनातनच्या आश्रमात होत आहे’, असे कौतुकोद्गार सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी काढले.

साधकांनो, एखाद्या साधकाचे नाव सांगून पैसे मागणार्‍या अनोळखी व्यक्तींपासून सतर्क रहा !

कुणी अनोळखी व्यक्ती घरी येऊन किंवा अन्य कुठेही भेटून किंवा भ्रमणभाष करून ग्रंथ आणि पंचांग वितरणाची रक्कम किंवा अन्य कोणत्या कारणास्तव पैसे मागत असेल, तर ते साधकांनी देऊ नयेत.

कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग

‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांच्यासह व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

भगवंत भावाचा भुकेला असतो ! भक्ताच्या भक्तीला प्रतिसाद देण्यासाठी तो आतुर असतो ! कधी व्रत-वैकल्यांच्या माध्यमातून, कधी स्वप्नदृष्टांताद्वारे, तर कधी अनुभूतींच्या माध्यमातून तो भक्तांना भगवंतभेटीची पुढची पुढची दिशा दाखवतो ! याची प्रचीती आज सनातनच्या साधकांनी घेतली.

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

या प्रसंगी सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह अन्य साधकांनीही पू. आजींच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेतले. पू. आजींच्या पार्थिवावर २२ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मुलगा आणि सनातनचे साधक श्री. राजेश मंगळवेढेकर यांनी अंत्यसंस्कार केले.