हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

सर्वत्र भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनैतिकता, बलात्कार या घटना वाढत आहेत. धर्मग्लानीच्या काळात धर्मसंस्थापनेची साधना करणे, ही काळानुसार साधना असते. त्यामुळे सध्या भारतात धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही साधना असणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

तमिळनाडूतील हिंदीविरोध योग्य कि अयोग्य ?

७ एप्रिल या दिवशी संसदीय राजभाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी “हिंदी ही इंग्रजीला पर्याय असू शकते आणि हिंदी ही देशातील अधिकृत भाषा असू शकते”, असे विधान केले होते. या विधानाला तमिळनाडूमध्ये राजकीय विरोध झाला. तमिळनाडूतील हा ‘हिंदीविरोध योग्य कि अयोग्य ?’ या विषयी चर्चा करणारे काही अनुभव…

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !

आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रतन यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली भेट !

श्री. रमेशचंद्र रतन यांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यावर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे कधीही रेल्वेशी संबंधित काही साहाय्य पाहिजे असल्यास मी सेवेसाठी सदैव तत्पर आहे.’’

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सर्वत्रच्या विद्यार्थी-साधकांना सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी !

आध्‍यात्मिक त्रासाच्‍या निवारणासाठी उपयुक्‍त ‘शून्‍य’, ‘महाशून्‍य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप ऐका !

‘कुठलीही गोष्‍ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्‍याच्‍या काळानुसार कुठल्‍या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्‍यात्‍मशास्‍त्रदृष्‍ट्या अभ्‍यास करून विविध नामजप महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विभागाने परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली ध्‍वनीमुद्रित केले आहेत.

वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला ! – सौ. शोभा पाटील, नगरसेविका, भाजप

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र तेथील स्वच्छता झाल्यामुळे त्या ठिकाणची प्रसन्नता अधिक वाढते.