गन्धर्व हरीतकी वटी (गोळ्या)

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

गन्धर्व हरीतकी वटी हे औषध पोट साफ करणारे आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे औषध पोट साफ करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
बद्धकोष्ठता, मलाचे खडे होणे, पोटात वायू (गॅसेस) होणे, पोट जड वाटणे, मळमळणे, आम्लपित्त, कावीळ, आमवात (सांधे आखडणे, सुजणे आणि दुखणे), कटीवेदना (कंबरदुखी), गृध्रसी (सायाटिका) आणि गुडघेदुखी दिवसातून १ – २ वेळा २ – ४ गोळ्या गरम पाण्यासह घ्याव्यात. अधिक लाभासाठी गोळ्या सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह घ्याव्यात आणि वर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. १ मास

 

२. सूचना

अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.

आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

 

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment