उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

शिव आणि दुर्गा यांचे कार्य प्रामुख्याने लयाशी संबंधित असले, तरी श्री गणेश प्रामुख्याने स्थितीचे कार्य करतो.

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या शालीची पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !

तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊस्वामी सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यासाठी वर्ष १९७० पासून यज्ञ करत आहेत.

अत्यंत उच्च तापमानाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या देहाचे तापमान सर्वसाधारण ठेवू शकणारे तंजावूर (तमिळनाडू) येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी !

यज्ञकुंडातील तापमान १४६.५ अंश सेल्सिअस होते. त्या वेळी त्या यज्ञकुंडात समर्पित झालेल्या प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस होते.

प.पू. रामभाऊस्वामी यांनी गोवा येथील सनातन आश्रमात केलेला उच्छिष्ट गणपति यज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.