प.पू. रामभाऊस्वामी यांनी गोवा येथील सनातन आश्रमात केलेला उच्छिष्ट गणपति यज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यज्ञ हे सनातन वैदिक धर्मातील एक महत्त्वाचे अंग आहे. राजसूय, अश्‍वमेध, पुत्रकामेष्टी आदी यज्ञांविषयी सविस्तर माहिती धर्मग्रंथांत आढळते. धर्मग्रंथांत वर्णिलेल्या यज्ञांचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी काही संत प्रयत्नरत आहेत. संतांच्या अथक प्रयत्नांमुळेच यज्ञसंस्कृती टिकून आहे. यज्ञसंस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असणारे तंजावूर तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी हे वैशिष्ट्यपूर्ण यज्ञांद्वारे समाजाला भौतिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील लाभ मिळवून देण्याचे दैवी कार्य करत आहेत. त्यांनी १५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

IMG_7935_c
यज्ञाला प्रारंभ होण्यापूर्वी त्या ठिकाणी यु.टी.एस्.द्वारे चाचणी करतांना

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

     एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

२. चाचणीचे स्वरूप

     या चाचणीमध्ये यू.टी.एस्. उपकरणाद्वारे यज्ञकुंडाचे यज्ञ आरंभ करण्यापूर्वी आणि यज्ञाचा पहिला दिवस झाल्यानंतर परीक्षण करण्यात आले. या दोन्ही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. उच्छिष्ट गणपति यज्ञ

या यज्ञाला १५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमात आरंभ झाला.

३ आ. यज्ञ करणारे संत प.पू. रामभाऊस्वामी

हे तमिळनाडूतील तंजावूर येथील ७८ वर्षीय संत आहेत. ते समर्थ रामदासस्वामींच्या परंपरेतील महान योगी आहेत.

४. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

table_1table

६ अ. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप १ : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६ आ. निरीक्षणांचे विवेचन

१. यज्ञ आरंभ होण्यापूर्वी आणि यज्ञाचा पहिला दिवस पूर्ण झाल्यानंतरही यज्ञकुंडाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२. यज्ञाचा आरंभ होण्यापूर्वी यज्ञकुंडाची प्रभावळ १.२४ मीटर होती. यज्ञाचा पहिला दिवस झाल्यानंतर ती पुष्कळ प्रमाणात वाढली आणि २.३१ मीटर झाली.

३. रामनाथी आश्रमाचा परिसर मुळातच सात्त्विक, म्हणजे सकारात्मक असल्याने यज्ञ आरंभ होण्यापूर्वी आणि यज्ञाचा पहिला दिवस यांतील निरीक्षणांत विशेष फरक आढळत नाही. इतरत्र यज्ञ केल्यास बराच फरक आढळतो.

७. निष्कर्ष

     या यज्ञामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांत वाढ झाली, हे या चाचणीतून लक्षात येते.

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.१.२०१६)

ई-मेल : [email protected]