उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

IMG_0264_C
भावावस्थेतील प.पू. रामभाऊस्वामी

समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या निमित्ताने…

कु. मधुरा भोसले
कु. मधुरा भोसले

१५.१.२०१६ या दिवशी तंजावूर तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी आणि त्यांचे शिष्यगण यांच्या शुभहस्ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये ३ दिवसांच्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचा शुभारंभ झाला. त्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

 

 

 

१. आध्यात्मिकदृष्ट्या अलौकिक
व्यक्तीमत्त्व असणारे प.पू. रामभाऊस्वामी !

शिव आणि दुर्गा यांचे कार्य प्रामुख्याने लयाशी संबंधित असले, तरी श्री गणेश प्रामुख्याने स्थितीचे कार्य करतो. द्वापरयुगात श्री गणेशभक्त महर्षि व्यास यांनी जे अलौकिक कार्य केले होते, तसेच अद्वितीय कार्य प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडून कलियुगात घडत आहे.

प.पू. रामभाऊस्वामी हे तपोलोकातील उन्नत आहेत. ते मागील जन्मांतही याज्ञिक होते आणि त्यांनी त्रेताग्निव्रताचे कठोर पालन करून द्वादश अग्नींवर प्रभुत्व प्राप्त करून अग्निलोकावर तपःसामर्थ्याने विजय प्राप्त केलेला आहे. त्यांचे सूर्यलोकावरही अधिपत्य असल्याने त्यांना केवळ अहिताग्नी म्हणून संबोधणे उचित नाही. त्यांना हिरण्यादित्य किंवा सूर्यलोक-विजेता म्हणून संबोधून त्यांचा गौरव करायला हवा.

पृथ्वीवर पंचाग्नीची उपासना करू शकतो; परंतु भूलोकात पंचमहाभूतांच्या उपासनेला मर्यादा आहे. पंचमहाभूतांचे ५ प्रतिशत तत्त्व सगुण रूपाने कार्य करत असते, तर उर्वरित ९५ टक्के तत्त्व अव्यक्त निर्गुण स्वरूपात असते. ९५ टक्के तत्त्वांतील ५० टक्के तत्त्व आवश्यकतेनुसार उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कार्य करण्यासाठी कार्यरत होते, तर उर्वरित ४५ टक्के तत्त्व सुप्तावस्थेत असते.

table_1

पंचमहाभूतांचे मूळ तत्त्व सूक्ष्मतम आहे. या तत्त्वांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पराकोटीच्या निष्काम साधनेची आवश्यकता असते. पंचमहाभूतांनी बनलेले शरीर धारण करून पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर साधना करणे, हे सामान्य मनुष्यालाच नव्हे, तर स्वर्गलोकातील देवता आणि महर्लोक, तसेच जनलोक येथील जीवात्म्यांसाठीही कठीणप्राय असते. तपोलोक आणि सत्यलोक येथील योगीजन शिवदशेत असतात. त्यामुळे ते सूक्ष्मतर स्तरावरील पश्यंती वाणीच्या स्तरावरील परासाधना करून पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यशस्वी होतात. धर्मसंस्थापनेचे कार्य करणार्‍या अवतारी पुरुषाचे पंचमहाभूतांवर नियंत्रण असल्यामुळे तो शिवधनुष्यरूप धर्मसंस्थापनेचे कार्य पेलू शकतो आणि पूर्णत्वास नेऊ शकतो. धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी झालेल्या जिवांना सुरळीतपणे कार्य करता यावे आणि अधर्मी शक्तींपासून त्यांचे रक्षण करता यावे, यासाठी तपोलोक आणि सत्यलोक येथील योगीजन शिवदशेत राहून साहाय्य करतात.

२. श्रीविष्णूच्या अवतारांद्वारे धर्मसंस्थापनेचे कार्य घडत असतांना या कार्याला
पूरक असणार्‍या अन्य देवतांची शक्ती कार्यरत होते. याची पुष्टी गणेशयागाने होते.

२ अ. सरस्वतीदेवीचे तत्त्व वेदांच्या रूपाने कार्यरत होऊन
धर्मसंस्थापनेचे कार्य साकारणार्‍या अवतारांना साहाय्यभूत होणे

वेद हे ब्रह्मज्ञानाचे शुद्धतम सगुण स्वरूप आहेत. जेव्हा माता वीणापाणी देवीचे (सरस्वतीचे) तत्त्व सगुण रूपात कार्यरत नसते; परंतु धर्मसंस्थापनेच्या कार्यात तिची आवश्यकता असते, तेव्हा तिचे तत्त्व ज्ञानस्वरूप असणार्‍या वेदांच्या रूपाने साकार होऊन कार्यरत होते. वेदांच्या उपस्थितीमुळेच ज्ञानाची जिज्ञासा जागृत होते. वेदांमुळेच सत्यलोकातील शुद्ध ज्ञानाचे परम तत्त्व पृथ्वीवर अवतरित होते आणि वेदांच्या अस्तित्वानेच व्यष्टी अन् समष्टी अशा दोन्ही स्तरांवरील सर्वोच्च ध्येय कोणते ?, याचे ज्ञान होते. सरस्वतीदेवी वेदांच्या रूपाने धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होत असते. त्यामुळेच कृतयुगाच्या आरंभी जेव्हा श्रीविष्णूने मत्स्यावतार धारण केला होता, तेव्हा त्याने मनु, शतरूपा, सप्तर्षि आणि बीजात्मक वेद यांचे रक्षण करून त्यांना महाप्रलयातून तारून नेले. याच अवताराने वेदांचे हरण करणार्‍या हयग्रीव नावाच्या दानवाचा वध करून वेदांची पाताळातून मुक्तता करून पुन्हा स्वतःच्या वाणीत धारण केले होते. नवसृष्टीची निर्मिती करण्यासाठी मत्स्यावताराने याच ओंकारस्वरूप वेदांना (आप्तवचनांना) सगुणात प्रगट केले आणि धर्मराज्याची स्थापना करण्यार्‍या मनूला सुपूर्द केले होते.

२ आ. श्रीविष्णूच्या अवतारांद्वारे होणार्‍या धर्मसंस्थापनेच्या
कार्यात सहभागी झालेल्या अन्य देवतांच्या तत्त्वाची वैशिष्ट्ये

table_2

 

३. प्रथमदिनी केलेल्या पशूधनाच्या पूजनाचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व

३ अ. पशुधनाच्या पूजनाने दिव्यत्व साकारणे
आणि यज्ञादी धार्मिक कर्मात त्यांना देवस्वरूप मानून
पूजन केल्याने गज, गौ आणि अश्‍व यांच्यातील दिव्यत्व प्रगट
होऊन त्यांचा समष्टी स्तरावर व्यापक अन् विपुल प्रमाणात लाभ होणे

गज आणि गौ हे समृद्धशाली राजाचे धन असते. अश्‍व हा शौर्यशाली पराक्रमी राजाच्या गौरवाचे प्रतीक आहे. पराक्रमी आणि सामर्थ्यशाली राजाकडे गज, गौ आणि अश्‍व हे विपुल प्रमाणात असतात. या धनाला केवळ पशूधन मानले, तर त्यांचे कार्य आध्यात्मिक स्तरावर न होता केवळ भौतिकदृष्ट्या पूर्ण होते. मर्यादित स्थूल कार्यापेक्षा अमर्याद असणार्‍या सूक्ष्म कार्याची प्रचीती घेण्यासाठी गज, गौ आणि अश्‍व यांना पशू न मानता देवस्वरूप किंवा देवाचे वाहन असल्याने दिव्यत्वाचे प्रतीक मानून आचरण केले, तर आपल्याला त्यांच्या दिव्य कार्याची अनुभूती घेता येते. गज, गौ आणि अश्‍व यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी त्यांना देवस्वरूप मानून त्यांचे पूजन करण्याचा धार्मिक विधी हिंदु धर्मात कर्मकांडांतर्गत सांगितलेला आहे. व्रत-वैकल्ये, होम-हवन आदींमध्ये त्यांचे पूजन केल्याने केवळ व्यष्टी स्तरावर लाभ होतो, तर यज्ञादी धार्मिक विधींच्या वेळी त्यांचे पूजन केल्यामुळे समष्टी स्तरावर व्यापक प्रमाणात लाभ होतो. यास्तव धर्मपरायण राजे अश्‍वमेध यज्ञ, पशूमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, वाजपेय यज्ञ आणि सावित्रीकाष्ठ्य यज्ञ यांसारख्या यज्ञांचे आयोजन करून ते भक्तीभावाने पूर्ण करायचे. त्यामुळे दैवी शक्तींचे कृपाशीर्वाद केवळ राजालाच नव्हे, तर संपूर्ण प्रजेलाही मिळत असत. त्यामुळे धर्मपरायण राजाची प्रजा सुखी आणि समाधानी होती, तसेच राज्यही समृद्ध असायचे. गोपूजनामुळे संचित होणार्‍या पुण्यातून व्यष्टी पातळीवरील ब्राह्मतेज प्रगट होते, तर गजपूजनामुळे समष्टी स्तरावरील पुण्याचा साठा वृद्धींगत होऊन समष्टी स्तरावर कार्यरत असणारे ब्राह्मतेज अधिक प्रमाणात, तसेच अल्प प्रमाणात क्षात्रतेज यांची वृद्धी होते.

३ आ. गज, गौ आणि अश्‍व यांचे पूजन केल्याने त्यांच्यातील
दिव्यत्व प्रगट होऊन समष्टी स्तरावर विपुल प्रमाणात होणारे लाभ

table_3

३ आ १. गोपूजन : प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञस्थळी रक्तवर्णाच्या (तांबड्या रंगाच्या) गायीचे पूजन केले. गाय मुळातच सात्त्विक प्राणी आहे. तिच्यामध्ये उपजतच सात्त्विकता, चैतन्य आणि दैवी शक्ती विद्यमान असते. गायीच्या वर्णाप्रमाणे तिच्यामध्ये विशेष गुण असतात, उदा. रक्तवर्ण गायीमुळे शुद्ध सकाम इच्छांची पूर्ती होते, तर श्‍वेत रंगाच्या गायीचा आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने, म्हणजे निष्काम इच्छांची पूर्ती होण्यासाठी अधिक प्रमाणात लाभ होतो. यज्ञस्थळी (वासरू असणार्‍या) रक्तवर्णी गोमातेचे पूजन केल्यामुळे तिच्यामध्ये असणार्‍या दिव्यत्वाचेच पूजन झाले आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास्तव तिच्यातील मूळ कामधेनूचे बीजात्मक तत्त्व अंकुरू लागले.

३ आ २. पूजन केलेल्या गायीच्या रंगानुसार तिच्या पूजनातून विविध प्रकारची फलश्रुति प्राप्त होणे : रक्तवर्णाच्या गायीमध्ये देवी आणि गणेश या दोन तत्त्वांचे प्राबल्य असल्याने त्यांच्या गोपूजनामुळे एकप्रकारे निर्गुण-सगुण स्तरावरील दिव्य तत्वाचेच पूजन होते. अनेक धार्मिक विधींमध्ये काळ्या रंगाच्या गायीचे पूजन वर्जित असणे; परंतु जातकर्म; तसेच शाक्त पंथातील काही विधी अन् अथर्ववेदानुसार अभिचार विद्या आणि अघोरी विधीचे कर्म करण्यासाठी काळ्या रंगाच्या गायीचे पूजन करून धार्मिक विधीत तिच्या दुधाचा नैवेद्य किंवा आहुती यांसाठी वापर करणे विशेष महत्त्वाचे असते.

३ आ ३. गजपूजन : ऐरावत इंद्राचे वाहन म्हणून पूर्व दिशेचा दिक्पाल (दिग्गज) म्हणून कार्य करत असतो, तर धर्म-अधर्माच्या युद्धात सोंडेत धर्मध्वज घेऊन धर्मसेनेचे नेतृत्व करण्यात जो अग्रसर असतो, त्या ऐरावताला गजेंद्र म्हणतात. धर्मध्वज घेऊन डोलात चालणारा गजेंद्र पाहिल्यावर असे वाटते की, तो सर्वत्र धर्मविजयाची पताकाच जणू आनंदाने फडकवत विजयोत्सव साजरा करत निघाला आहे. ऐरावत ऐश्‍वर्याचा सात्त्विक उपभोग करण्याची वृत्ती दर्शवतो, तर गजेंद्र हा इंद्रियरूप रिपूंचे दमन करून सद्गुणांची वृद्धी करून परमानंदाची लयलूट करणार्‍या विलासी आत्मतत्त्वाचा सूचक आहे.

३ आ ४. गज (हत्ती), ऐरावत आणि गजेंद्र यांच्यातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांनुसार असणारा भेद : गज (हत्ती) हे ऐश्‍वर्य आणि राज्यसत्ता यांचे प्रतीक आहे. ऐरावत हे देवांचा राजा इंद्र याच्या स्वर्गीय वैभव आणि संपत्ती यांचे प्रतीक आहे, तर गजेंद्र हा धर्मपरायण, पराक्रमी अन् विनयशील अशा धर्मराजाच्या (सम्राटाच्या) दैवी संपदेचे प्रतीक आहे. धर्मध्वज धारण केलेल्या हत्तीला गजेंद्र असे संबोधन करावे; कारण तो धर्माची धुरा यशस्वीपणे सांभाळणार्‍या देवेंद्राचे प्रतीक आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात