अत्यंत उच्च तापमानाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या देहाचे तापमान सर्वसाधारण ठेवू शकणारे तंजावूर (तमिळनाडू) येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

IMG_0302
प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान मोजतांना
IMG_0067_C
मिनी रे थर्मामीटर (या उपकरणाने ४ फूट अंतरावरील व्यक्ती अथवा वस्तूचे तापमान मोजता येते.)

table_1

१. उच्छिष्ट गणपति यज्ञाची १७.१.२०१६ या दिवशी
तापमानमापक (मिनी रे थर्मामीटर) यंत्राद्वारे केलेली निरीक्षणे

टीप : या उपकरणाने यज्ञकुंड आणि शाल यांपासून ४ फूट अंतरावरून त्यांचे तापमान मोजले आहे. हे उपकरण थेट देहावरील तापमान मोजता येण्यासाठी बनवलेले नाही. त्यामुळे देहावरील शालीचे तापमान मोजले आहे.

२. विवरण

     यज्ञकुंडातील तापमान १४६.५ अंश सेल्सिअस होते. त्या वेळी त्या यज्ञकुंडात समर्पित झालेल्या प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस होते. प.पू. रामभाऊस्वामींच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे यज्ञकुंडातील अत्यंत उच्च तापमानातही त्यांच्या देहावरील शालीचे तापमान वाढलेले नाही.

     संतांच्या साधनेमुळे धगधगता यज्ञाग्नि त्यांच्या देहाला जाळू शकत नाही, याचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. असे केवळ आध्यात्मिक साधनेमुळेच शक्य होऊ शकते. धगधगत्या अग्नीतही भगवंताच्या कृपेमुळे भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिल्याचे श्रीमद् भागवतामध्ये दिले आहे. आध्यात्मिक सामर्थ्यामुळे प.पू. रामभाऊस्वामी धगधगत्या यज्ञकुंडात सुरक्षित रहातात, हे पाहिले की, हिंदूंच्या धर्मग्रंथात दिलेली उदाहरणे म्हणजे काल्पनिक कथा नव्हेत, हे सिद्ध होते.

– श्री. रूपेश रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.१.२०१६)


प.पू. रामभाऊस्वामींना अग्नी
स्पर्श करू न शकण्यामागील आध्यात्मिक कारण

     प.पू. रामभाऊस्वामींमध्ये तेजतत्त्व हे अग्नीपेक्षा अधिक आहे; म्हणून अग्नी त्यांना जराही आणि त्यांच्या वस्त्रांना अधिक स्पर्श करू शकत नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात