रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’ – अधिवक्ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.
‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’ – अधिवक्ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.
मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.
‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘अॅप’च्या साहाय्याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत होतो. प्राणप्रतिष्ठापनेचे मंत्र चालू झाल्यावर मी माझ्या उजव्या हाताची बोटे श्री गणेशमूर्तीच्या हृदयावर ठेवली. तेव्हा मला श्री गणेशमूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी स्पंदने जाणवू लागली.
दादर येथील शिवाजी पार्क येथून २९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, अशी मागणी या मोर्च्यामध्ये करण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले. रवाना होणार्या धारकर्यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कांतावती देशमुख यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
‘टाटा स्टील’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. संशोधनातील पुरस्कार डॉ. रणजित काशिद यांना देण्यात येणार आहे. ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात.
‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतिवर्षी मार्चमध्ये, तसेच जुलै ते सप्टेंबर या काळात शासकीय वाचनालयांना ग्रंथ खरेदीसाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होते. त्यानंतर त्या वाचनालयाचे संचालक विविध ग्रंथ खरेदी करतात. वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.