रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांचा देहत्याग !

मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जूनच्या रात्री १० वाजता रत्नागिरी येथे देहत्याग केला. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

लहान मुलांसाठी वेखंडाचा उपयोग

लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून पिवळसर छटा येणे आणि त्याला अष्टगंधाचा सुगंध येणे यांमागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून विश्‍वाचे कल्याण होणार आहे. त्यांच्याकडून सूक्ष्मातून होत असलेल्या या अद्वितीय कार्याचा स्थुलातील परिणाम त्यांच्या नियमित वापरात असलेल्या वस्तूंवर दिसून येतो. या लेखात सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.

वृद्धाश्रमांची व्यथा !

कोरोनामुळे ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृद्धांना सांभाळण्याची समस्या. आधीच वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवण्याची मानसिकता समाजात वाढत असतांना त्यात कोरोना महामारीचे निमित्त झाले.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत ‘ऑनलाईन प्रथमोपचार शिबिर’ पार पडले !

या शिबिरात मूलभूत जीवित रक्षण साहाय्य, हृदय-श्वसन पुनरुज्जीवन तंत्राचा वापर, सुरक्षित आरामदायी स्थिती, पाठीच्या दुखापतीमध्ये प्रथमोपचार करतांना कशी काळजी घ्यावी, त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने झोळी बांधणे, रस्त्यावरच्या अपघातामध्ये रुग्णाचे शिरस्त्राण काढणे, रुग्णाला इतरत्र वाहून नेण्याच्या विविध पद्धती, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

गुरुकृपायोगानुसार साधना करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार आणि भागीदार होऊया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रत्येक मनुष्यावर पितृ ऋण, गुरुऋण, ऋषिऋण आणि समाजऋण असते. आई-वडिलांची सेवा करून त्यांचे ऋण फेडता येते. ऋषींनी सांगितलेली साधना करून त्यांचे ऋण फेडता येते. गुरूंनी सांगितलेली साधना समाजाला सांगून म्हणजे समष्टी साधना करून समाजऋण आणि गुरुऋण फेडता येते. यासमवेत समष्टी साधनेसह व्यष्टी साधना करणेही आवश्यक आहे.

सनातन संस्थेच्या वतीने ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर पार पडले ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कोची कालिकत येथील ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या संचालिका सौ. स्नेहलता मालपाणी यांनी त्यांच्या समितीच्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित केले होते.