शास्त्रोक्त, प्रभावी आणि ईश्वरी अधिष्ठान ठेवून औषधांची निर्मिती करणारे पू. वैद्य विनय भावेकाका !

आयुर्वेदाचे शिक्षण घेतल्यावर काही काळ पू. वैद्य विनय भावे यांनी सुदर्शन आयुर्वेद भवनच्या कार्यात सहभाग घेतला. नंतर त्यांनी वरसई येथे ‘श्री अनंतानंद औषधालय’ या नावाने स्वतःचा वेगळा कारखाना काढला.

सनातनचे ४७ वे संत पू. रघुनाथ राणे (वय ८२ वर्षे) यांचा ठाणे येथे देहत्याग !

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम या गावचे रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले सनातनचे संत पू. रघुनाथ वामन राणे (पू. राणेआजोबा) (वय ८२ वर्षे) यांनी ११ जुलै २०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजता मुंबई येथील रुग्णालयात देहत्याग केला.

पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा साधनाप्रवास ! (भाग १)

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी ३३ वर्षे माध्यमिक शिक्षिका म्हणून कन्या शाळा कराड येथे नोकरी केली. इतिहास, भूगोल, इंग्रजी आणि गृहशास्त्र (होम सायन्स) हे विषय त्या शिकवत असत. वर्ष १९९३ मध्ये त्या निवृत्त झाल्या. वर्ष १९९७ पासून त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला.

शांत, संयमी आणि प्रेमभाव या गुणांमुळे गावकर्‍यांना आधार वाटणारे अन् औषधनिर्मिती आणि वैद्यकीय व्यवसाय सेवाभावाने करणारे पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !

६.७.२०२१ या दिवशी पू. भावेकाका यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. भावेकाका यांचा मुलगा श्री. विक्रम भावे यांना लक्षात आलेली वडिलांची वैशिष्ट्ये त्यांच्याच शब्दांत येथे दिली आहेत.

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली.

‘सर्व काही देवच करवून घेतो’, या भावात असणारे आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणारे सनातनचे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा !

पू. आबा कर्मकांडही पुष्कळ भावपूर्ण आणि मनापासून करायचे. त्यामुळे माझ्या मुलींवर कर्मकांड मनापासून करण्याचे आणि इतरही अनेक चांगले संस्कार झाले आहेत.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील (वय ७९ वर्षे) !

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांनी साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या गावात पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथे त्यांनी सनातनच्या सत्संगाचा प्रसार केला. तसेच त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचेही वितरण केले. जळगाव सेवाकेंद्रात जाऊन त्या सेवाही करायच्या. आता त्या समष्टीसाठी नामजप करतात.

रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांचा देहत्याग !

मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जूनच्या रात्री १० वाजता रत्नागिरी येथे देहत्याग केला. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग ४

एकदा मनात परम पूज्यांविषयीचे विचार आले. मी सूक्ष्मातून त्यांना म्हणालो, ‘परम पूज्य, तुम्ही मला दर्शन द्या’ आणि डोळे बंद करून भावाच्या स्थितीत बसलो. मी डोळे उघडले, तेव्हा परम पूज्य सर्व जागा व्यापून उभे होते. मी मान वर करून बघितले, तर ते मला उंच उंच होतांना दिसले. त्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले होते. मी लगेचच त्यांना साष्टांग नमस्कार घातला.

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग ३

‘वर्ष १९६४ मध्ये माझे लग्न झाले. आतेभावाच्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे मुलगी ओळखीतील आणि नात्यातील होती. माझे लग्न आई-वडिलांच्या संमतीने ठरवून झाले. मुलगी ‘एस्.एन्.डी.टी.’ महाविद्यालयात साहाय्यक व्याख्याती (लेक्चरर) होती. माझा विवाह झाला, तेव्हा मला ४५० रुपये वेतन होते.