श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून ईश्‍वरप्राप्तीसाठी कला समर्पित करणारे सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांना प.पू. डॉक्टरांनी दिलेले मूर्तीज्ञान आणि त्यांच्या चैतन्यानुभूती !

सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डी.एम्.सी., ए.टी.डी. आणि जी.डी. आर्ट (पेंटींग) चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९९६ ते २००० या कालावधीत मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकारासमवेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले.

प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या आणि साधकांना आधार देणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) !

प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांचा नारळी पौर्णिमा (१७.८.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !       १. प्रेमभाव १ अ. आजारपणात साधिकेची काळजी घेणे १ अ १. साधिकेला … Read more

इंग्रजी अंक, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अंक आणि सात्त्विक पद्धतीने लिहिलेला अंक यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्‍वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्‍वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे.

पूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे कलियुगात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारे प.पू. डॉक्टर !

सप्तर्षींनी सर्वांसाठी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणं । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।, हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे आपल्यावर निसर्गाची कृपा होणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झाले आहेत. ते आपल्याला नेहमी चैतन्याची महती सांगतात.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

पू. आजींचा एकूण प्रवास निर्गुणाच्या दिशेनेच होता. देहत्यागानंतरही त्यांच्या अस्थींनी निर्गुण गंगेकडेच धाव घेतली आणि नंतर त्या पंचगंगेच्या प्रवाहात जाऊन विलीन झाल्या.

सनातनच्या संत पू. सखदेवआजी यांची UTS उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी !

सामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्‍चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो.

पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा जोधपूरच्या महापौरांच्या हस्ते सन्मान !

नुकताच जोधपूर महापालिकेचे महापौर श्री. घनश्याम ओझा यांच्या हस्ते सनातनच्या संत पू. (सौ.) सुशील मोदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे, तसेच राष्ट्र-धर्मविषयी समाजात जागृती आणण्याच्या कार्यामुळे पालिकेकडून हा सत्कार करण्यात आला.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्यांना आनंदाने तोंड कसे द्यायचे, याचा आदर्श देहत्यागाच्या क्षणापर्यंत सर्वांसमोर ठेवणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी !

पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच !

साधकांची पोटच्या मुलांप्रमाणे मायेने काळजी घेणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी !

जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी (पू. मोदीभाभी) यांचा आणि माझा परिचय प्रथम देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झाला. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी बरेच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या मला प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहेत, असे जाणवले.

गडद रंग आणि फिकट रंग यांच्या संदर्भातील आध्यात्मिक प्रयोग

प्रथम गडद रंगांच्या चौकोनांकडून सर्वांत फिकट रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. नंतर त्या उलट म्हणजे फिकट रंगांच्या चौकोनांकडून गडद रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. असे ४ – ५ वेळा करून काय वाटते, ते अनुभवा.