जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !
एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !
एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !
प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते. पुष्कळ आयुर्वेदीय महाविद्यालयांच्या रोपवाटिका असतात. स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.
औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.
औषधी वनस्पतींची चालू शेतीतही आंतरपीक म्हणून लागवड करता येते. कोणत्या पिकामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात याची सूची पुढे दिली आहे.
औषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांबरोबरच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात, तर काही औषधी झाडांपासून फळेही मिळतात.एकूणच औषधी वनस्पती या बहूपयोगी सिद्ध होतात.
शहरातील सदनिकांमध्ये पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील.
आगामी भीषण आपत्काळात औैषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक !
‘दैनंदिन कामे करतांना वा कुठे बाहेर जातांना आपल्याला अनेक प्रकारची वजने उचलावी लागतात. ती उचलतांना आपल्या शरिरावर कळत-नकळत ताण येत असतो. वजन उचलतांना ते चुकीच्या पद्धतीने उचलल्यास शरिराची हानी होऊ शकते.
शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे झाल्यास आपले स्नायू दमतात किंवा आखडल्यासरखे होतात. अशा वेळी त्यांत अशुद्ध द्रव्य निर्माण होते. मर्दन केल्याने ही अशुद्ध द्रव्ये मूळ प्रवाहात प्रवाहित होण्यास प्रवृत्त केली जातात.
‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.