कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे

​पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या ‘श्री अनंतानंद औषधालय’ या आयुर्वेदाच्या औषध निर्मिती आस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट औषधे बनवून अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. पू.

संसर्गाच्या कालावधीत घ्यावयाचा आहार आणि आरोग्याची स्थिती लवकर पूर्वपदावर येण्यासाठीचे उपाय

सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.

लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !

लाकडी घाण्याचे तेल हे अत्यंत शुद्ध, रसायनेविरहित आणि आरोग्यास हितकारक असते, तसेच ते नैसर्गिक अन् शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केले जाते. त्याला शुद्ध तेलाचा वास येतो आणि ते चिकटही असते; कारण त्यामध्ये ४-५ प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. लाकडी घाण्यात तेल काढतांना अत्यल्प घर्षण झाल्याने त्यातील एकही नैसर्गिक घटक नाश पावत नाही.

‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्रीष्म ऋतूच्या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्वसिद्धता

सर्वांनीच प्रतिदिन दिवसातून ५ – ५ मिनिटे असे तीन वेळा दीर्घ श्‍वास घ्यावा. हा श्‍वास घेतांना अधिकाधिक हवा फुप्फुसांत ओढून घ्यावी. ही हवा शक्य तेवढा वेळ आत धरून ठेवावी. (म्हणजे कुंभक करावा.) आणि नंतर ती सावकाश सोडावी. असे केल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते. कोरोनामध्ये फुप्फुसे घट्ट होण्याची शक्यता असते. असे केल्याने ती शक्यता अल्प होते.

भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र विधीला ‘पेटंट’ !

भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. हे ‘पेटंट’ मिळवण्यासाठी बेळगावचे सुपुत्र डॉ. प्रमोद मोघे, तसेच त्यांचे सहकारी प्रणय अभंग आणि गिरीश पठाणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. या समस्येमुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवतात. कित्येकजण प्रतिदिन पोट साफ होण्यासाठी औषधे घेतात. यांतील बहुतेक औषधांमुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा उत्पन्न होतो. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या बळावत जाते.

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

पुणे येथे श्री. अरविंद जोशी नावाचे विविध भारतीय उपचारपद्धतींचा अभ्यास करणारे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधक वृत्तीने या फुलांचे औषधी गुणधर्म शोधून त्यांचा अनेकांना लाभ करून दिला आहे. या फुलांपासून लाभ झाल्याची अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा एक लेख वाचून मी काही रुग्णांना ही फुले दिली, तर त्यांनाही पुष्कळ लाभ झाल्याचे लक्षात आले.

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.