कुंडीत असलेल्या झाडांसाठी ‘नैसर्गिक पद्धत’ कशी वापरावी ?

नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’

कुंडी कशी भरावी ?

. . . अशा प्रकारे भरलेल्या कुंडीमध्ये पुष्कळ पाऊस असतांनाही पाणी साचून रहात नाही आणि झाडाचे आरोग्य टिकून रहाते.

आच्छादन म्हणजे काय ?

‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन.’ मातीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते.

घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सहज करता येण्याजोगी भाजीपाल्याची लागवड

पेठेतून आणलेल्या पालक किंवा पुदीना यांच्या जुडीत काही वेळा मुळांसकट काड्या असतात, त्या मातीत खोचल्यास त्यांच्यापासून पुन्हा रोपे येतात. कोंब फुटलेले आले, कांदा, बटाटा, रताळे, सूरण, अळकुडी (अळूचा कंद) यांपासूनही नवीन लागवड करणे सहज शक्य आहे.’

विषमुक्त अन्नासाठी घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

आपल्याला घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त अन्न पिकवणे सहज शक्य आहे. चला ! सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी होऊन विषमुक्त अन्नाचा संकल्प करूया !

भारतीय कृषी परंपरेचे महत्त्व आणि या परंपरेला टिकवून ठेवण्याची आवश्यकता

पुरातन भारतीय कृषी परंपरा ही निसर्गाला अनुकूल होती. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा देशी बियाण्यांचा उपयोग करणे, मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि शेतातील जिवाणू, कीटक, तसेच पिके यांची जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) राखणे अशा भक्कम पायावर ही व्यवस्था उभी होती.

अत्यल्प व्ययात, तसेच सहज उपलब्ध साहित्यामध्ये घरच्या घरी भाजीपाला लागवड करा !

येणार्‍या भीषण आपत्काळात सर्वांनाच न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी सनातनने ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू केली आहे.

‘सेंद्रिय शेती’ म्हणजे ‘नैसर्गिक शेती’ नव्हे !

‘कोकोपीट’ वापरणे, पेठेतून सेंद्रिय खते विकत आणून झाडांना घालणे, कंपोस्ट खत बनवणे या गोष्टी सेंद्रिय शेतीत येतात; नैसर्गिक शेतीत येत नाहीत.