पीठ, धान्य आणि मसाले खराब न होण्यासाठी घ्यावयाची काळजी

Article also available in :

स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली पिठे, धान्य आणि मसालेही खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा पिठात येणारे किडे आपल्यासाठी त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पिठे आणि डाळी यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी काही सोप्या युक्त्या येथे देत आहोत.

१. मोहरीच्या तेलाचा वापर

तांदूळ, पीठ आणि डाळी यांना किडे अन् ओलसरपणा यांपासून दूर ठेवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर पुष्कळ उपयुक्त ठरू शकतो. यासाठी १ चमचा मोहरीचे तेल कडधान्यात मिसळून सूर्यप्रकाशात ठेवल्याने किडे आपोआप नाहीसे होतात आणि धान्य ओलसर होण्यापासूनही वाचते.

 

२. लसूणाचा वापर

लसूणाच्या काही पाकळ्या सुकवून त्या डाळ, तांदूळ आणि पीठ यांच्या डब्यात ठेवा. यामुळे पावसाळ्यातही धान्य सुरक्षित राहील आणि किड्यांची समस्याही होणार नाही.

 

३. धान्य सूर्यप्रकाशात ठेवा !

धान्यातील कीटक काढण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाश दाखवणे, हा सर्वोत्तम पर्याय आहे. धान्याला सूर्यप्रकाश मिळताच सर्व किडे बाहेर येतात. त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या पीठ, डाळी किंवा तांदळात किडे असतील, तर ते थोडा वेळ उन्हात ठेवावे.

 

४. धान्यात कडुलिंबाची पाने ठेवा !

कडुलिंबाच्या पानांचा वापर हा कडधान्यामधील कीटकांना दूर करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. यासाठी कडुलिंबाची पाने सुकवून ती रवा, मसाले किंवा धान्य यामध्ये ठेवावीत. तसेच हे सर्व खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात बंद ठेवल्यानंतरच त्यात ती ठेवावीत.

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)

Leave a Comment