नायगाव (पालघर) येथील डॉ. संगीता म्हात्रे यांना श्री गणेशमूर्ती, देवघरात ठेवलेला कलश आणि विड्याची पाने यांमध्ये दैवी पालट झाल्याची आलेली अनुभूती
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी आमच्या घरातील देवघरात श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर मला श्री गणेशमूर्तीच्या समोर लावलेले निरांजन आणि समई यांच्या ज्योतींचे मूर्तीच्या डोळ्यांत प्रतिबिंब पडलेले दिसले. डाव्या डोळ्यात ते अधिक स्पष्टपणे दिसत होते.
