चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे
३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. माझ्या चारचाकीच्या पुढे एक ट्रक (मालगाडी) होता. त्या ट्रकमध्ये अगदी वरपर्यंत सामान भरले होते. मार्गावरील विजेच्या तारा त्या सामानात अडकल्या आणि तो ट्रक त्या तारांना तसाच ओढत पुढे चालला होता.
