सुखदुःखाचे प्रकार (भाग १)

कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात ७५ प्रतिशत दु:ख तर २५ प्रतिशत सुख असते. यांतून जीवनातील विविधप्रसंगी होणार्‍या सुखदु:खांची कारणे तसेच त्यांच्या कारणमीमांसेची व्याप्ती आणि सखोलता आपल्याला लक्षात येईल.

सुखदुःखाचे प्रकार (भाग २)

प्रारब्धामुळे जे घडत असते, ते आध्यात्मिक कारणांमुळे घडत असते. वाईट शक्तीने भारलेले रस्त्यावर टाकलेले लिंबू एखाद्याने प्रारब्धामुळे अनवधानाने ओलांडले, तर त्यालाही त्रास होऊ शकतो. कधी कधी क्रियमाणानेही आध्यात्मिक, म्हणजे बुद्धी-अगम्य अशा गोष्टी घडतात, उदा. एखाद्याला सांगितले की, अमूक एका ठिकाणी जाऊ नकोस.

सुखदु:ख आणि आनंद

कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आनंद हा यांपलीकडे असून सुखदु:ख आणि आनंद यांतील भेद, सुख आणि आनंद यांची तुलना इत्यादी अभ्यासपूर्ण माहिती या लेखातून करून घेऊया.

दु:ख : महत्त्व आणि लक्षणे

जगाच्या पाठीवर एकही मनुष्य असा नसेल की जो ‘मला दु:ख आवडते’ असे म्हणेल. या लेखात आपल्या प्रत्येकाला तिटकारा असलेल्या याच दु:खाचे महत्त्व काय आहे आणि आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास काय लाभ होतात, हे जाणून घेणार आहोत.

दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ?

प्रत्येकाचे जीवन सुखदु:खात हेलकावे खात असते. सर्वांना सुख हवेहवेसे वाटते; तर दु:ख आपला शत्रू असल्यासारखे वाटते. एखाद्याच्या पुढ्यात आलेले ‘दु:ख पूर्णत: टाळता येईल का’, हे अनुभवणे तर सोडाच, परंतु सहसा कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही.

आनंद कसा मिळवायचा ?

आनंद म्हणजे ‘स्व’ ला विसरणे. ‘ब्रह्मात विलीन झाले की, शाश्वत सुख मिळते, असे धर्म सांगतो. ते जर खरे असेल, तर व्यक्तीच्या दृष्टीने ‘मोक्ष म्हणजे आत्मा ब्रह्मात विलीन होणे’, हेच परमोच्च साध्य होय.

Bhav Satsang

आनंद

आनंद म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडची जीवात्म्याला शिवदशेत किंवा शिवात्म्याला अनुभूतीस येणारी अनुकूल संवेदना. आनंदाच्या विविध व्याख्या, आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?; जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ? इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

अनंताचे आनंददायी शास्त्र अध्यात्म ! – प.पू. डॉ. जयंत आठवले

एखाद्याला शब्दज्ञान किती आहे, याला अध्यात्मात किंमत नाही. टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या गोष्टी ओळखता येणे व त्या स्वतःत असणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे.