रामनाथी आश्रमात ‘उद्वाहन यंत्र’ (लिफ्ट) बसवण्यासाठी धनरूपात साहाय्य करा !

अतिथींच्या सोयीसाठी, तसेच आश्रमातील वयस्कर आणि रुग्णाईत साधकांसाठी उद्वाहन यंत्र (लिफ्ट) बसवण्याची नितांत आवश्यकता आहे.

‘ट्रेडमिल’चे तांत्रिक ज्ञान असलेल्यांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये साधकांना व्यायामासाठी ‘ट्रेडमिल’ (चालण्याचा व्यायाम करण्याचे यंत्र) आहे. ‘ट्रेडमिल’चा वापर, तसेच त्याची देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी ?’, या संदर्भात प्राथमिक माहिती, तसेच तांत्रिक साहाय्य हवे आहे.

कुंभमेळ्याच्या (प्रयागराज) निमित्ताने धर्मकार्यात साहाय्य करण्याची अमूल्य संधी !

कुंभमेळ्यानिमित्त येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी अल्पाहार (न्याहारी) अन् भोजन, निवास, दुचाकी आणि चारचाकी वाहन यांकरता साहाय्य करण्याची आवश्यकता आहे.

वाराणसी अथवा प्रयाग येथे सनातन आश्रमाच्या उभारणीसाठी ४ – ५ सहस्र चौरस मीटर भूमीची (जागेची) आवश्यकता !

संस्थेच्या उत्तर भारतातील कार्याचा वाढता आवाका पहाता वाराणसी अथवा प्रयाग (अलाहाबाद) येथे ४ – ५ सहस्र चौरस मीटर भूमीची (जागेची) आवश्यकता आहे.

सनातन आश्रमाच्या बांधकामासाठी विविध ‘मशिन टूल्स’ची आवश्यकता !

सध्या आश्रम आणि सेवाकेंद्रे यांचे नव्याने बांधकाम, तसेच नूतनीकरण (रिनोव्हेशन) करणे चालू आहे. यासाठी ‘मशिन टूल्स’ची आवश्यकता आहे.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धनत्रयोदशीच्या सुमुहुर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

आश्रमातील नेटवर्किंग अन् टेलीफोन यांच्या संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात यथाशक्ती हातभार लावा !

सनातनच्या गोवा येथील नवीन आश्रमाचे निर्माणकार्य चालू आहे. त्यासाठी लागणारे नेटवर्किंग आणि टेलीफोन यांच्या संदर्भातील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रकांची (‘फोटो कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण आणि छायाचित्रण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्या दृष्टीने नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.

सनातनच्या आश्रमासाठी ‘झेरॉक्स’ यंत्र खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करा !

सनातनच्या आश्रमांमध्ये हिंदु धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिके प्रकाशित करणे, ग्रंथनिर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकाच्या साहाय्याने केल्या जातात. त्यासाठी Canon आस्थापनाच्या ‘झेरॉक्स’ यंत्राची आवश्यकता आहे.

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा साठा इतरत्र पाठवण्यासाठी आवश्यक असलेली खोकी अन् प्लास्टिक देऊन वा त्यासाठी धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात हातभार लावावा !

‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांना समाजातून पुष्कळ मागणी येत आहे. भारतभरातील विविध जिल्ह्यांना त्यांच्या मागणीनुसार ग्रंथ आणि उत्पादने यांचा पुरवठा करण्याची सेवा सनातनचा देवद येथील आश्रम आणि मंगळूरू येथील सेवाकेंद्र, येथे केली जाते.