कोकण प्रांतातील (रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा) अर्पणदात्यांना धान्य अर्पण करण्याची सुसंधी !

धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या रामनाथी (गोवा)
येथील सनातनच्या आश्रमाला धान्य अर्पण करून धर्मकार्यात सहभागी व्हा !

‘सनातन संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. संस्थेच्या आश्रम आणि सेवाकेंद्र यांमधून धर्मप्रसाराचे कार्य केले जाते. सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्यक कार्य आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांना अन्न-धान्य दान करणे’, हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक साधक आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करत आहेत. यामुळे सनातनच्या रामनाथी आश्रमात धान्याची आवश्यकता असते. सहा मासांसाठी आश्रमातील साधकांसाठी आवश्यक असणारी धान्ये आणि कडधान्ये आदींची सूची पुढे दिली आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील धान्ये आणि कडधान्ये आदी अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment