‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधनाच्या कार्यासाठी छायाचित्रकांची (‘कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

विश्वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत, तसेच सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचेही छायाचित्रीकरण केले जात आहे. हे छायाचित्रीकरण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांसाठी हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्‍या दुचाकी वाहनांची आवश्यकता !

सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था असून हे कार्य अर्पणदाते, हितचिंतक, विज्ञापनदाते यांनी दिलेल्या अर्पणावर चालते. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात दैनंदिन कामकाजासाठी पेट्रोलवर चालणारी वाहने वापरण्यात येतात. सध्या पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्यावरील दुचाकी वाहने चालवणे खर्चिक झाले आहे.

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे साधक, तसेच प्रसारसेवा करणारे साधक अन् त्यांचे कुटुंबीय यांना आपत्काळात तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी ३ रुग्णवाहिकांची आवश्यकता !

आपत्कालीन स्थितीचा विचार करता सनातनच्या विविध आश्रमांसाठी ३ रुग्णवाहिकांची तातडीने आवश्यकता आहे. वैद्यकीय सुविधा आणि अन्य तांत्रिक गोष्टी यांचा विचार करता ‘फोर्स’ (FORCE) या आस्थापनाच्या ‘बेसिक लाईफ सपोर्ट टाईप सी’ (Basic Life Support Type C) या ३ रुग्णवाहिकांची खरेदी करावयाची आहे.

औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध जिल्ह्यांत औषधी वनस्पतींची लागवड चालू आहे. साधक घरोघरी कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रणासाठी (‘फोटोग्राफी’साठी) विविध उपकरणे आणि साहित्य यांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्‍या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवणे, हे आपले धर्मकर्तव्यच आहे. या धर्मकार्यात सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावा !

सनातनच्या रामनाथी आश्रमात लागवडीची सेवा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

‘सनातनच्या रामनाथी आश्रम परिसरात विविध औषधी वनस्पती, फळे, फुले आदींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या संदर्भातील सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.

सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती आवश्यक आहे.