सर्वत्रच्या अर्पणदात्यांना दानाची सुसंधी !
‘सनातन संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. संस्थेच्या आश्रम आणि सेवाकेंद्र यांमधून धर्मप्रसाराचे कार्य केले जाते. सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्यक कार्य आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांना अन्न-धान्य दान करणे’, हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शेकडो साधक आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करत आहेत. आश्रमात धर्मप्रसारार्थ अधिवेशने, शिबिरे, कार्यशाळा आदी उपक्रम वर्षभर चालू असतात आणि यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरही येत असतात. यामुळे सनातनच्या रामनाथी आश्रमात विपुल प्रमाणात धान्याची आवश्यकता असते. सहा मासांसाठी आश्रमातील साधकांसाठी आवश्यक असणारी धान्ये, मसाल्याचे पदार्थ आदींची सूची बाजूला दिली आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील धान्ये, मसाल्याचे पदार्थ आदी अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था


लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्यांची आवश्यकता !
सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा...
राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे...