केवळ गायत्री मंत्रच नव्हे, तर अन्य मंत्रांचा अन्य कोणत्या
आजारांच्या निर्मूलनासाठी उपयोग होतो, याचेही आता संशोधन केले पाहिजे !
केंद्रीय विज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ‘एम्स’ला ३ लाख रुपये !
नवी देहली – केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ? यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
या रुग्णालयात करण्यात येणार्या या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या २० जणांची निवड केली जाणार आहे. यांपैकी एका गटाला नेहमीचे वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत, तर दुसर्या गटाला नेहमीच्या उपचारांसमवेत आयुर्वेदीय औषधे, गायत्री मंत्राचे पठण आणि योगासने करायला सांगितली जातील. त्यानंतर दोन्ही गटाच्या रुग्णांवर काय परिणाम झाले आहेत, हे पडताळले जाईल. रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स तैनात असतील. साधारण २-३ मास हे संशोधन चालेल. या काळात रुग्णांना नेहमीच्या औषधांसमवेत पतंजलीचे ‘कोरोनील’ हे आयुर्वेदीय औषधही देण्यात येईल. या उपचारांनी कोरोना रुग्णांना काही साहाय्य होते का, हे पडताळले जाईल, अशी माहिती डॉ. रूची दुआ यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...