अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेचा ‘सनातन फायनान्सर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’शी कोणताही संबंध नाही ! – सनातन संस्थेचा खुलासा

‘सनातन संस्था’ ही आध्यात्मिक (अध्यात्मप्रसार करणारी) संस्था असून तिचा कुठल्याही प्रकारे या आर्थिक अस्थापनाशी संबंध नाही, तसेच सनातनचा एकही साधक या आर्थिक आस्थापनाशी संबंधित नाही.

उजनी धरणाने गाठला तळ

पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे, तर दळणवळण बंदीमुळे इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

‘म्युकरमायकोसिस’ आजाराची पहिली रुग्ण महिला !

कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ नावाचा आजार आढळून येत आहे. हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ; पण अत्यंत घातक संसर्ग आहे. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर, मेंदू, हिरड्या, छाती तसेच शरिरात कुठेही होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तसेच या आजाराचे प्रमाण वाढण्याची भीतीही तज्ञांनी व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भर उन्हाळ्यात नद्यांना पूर

जिल्ह्याच्या काही भागांत ९ मे या दिवशी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता.

चीनची गलवान खोर्‍यात युद्धसिद्धता !

भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जात असतांना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची सिद्धता केली आहे, असे दिसून येत आहे. चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिक ‘पी.एच्.एल्.-३’ हे रॉकेट लाँचर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनची सरकारी दूरचित्रवाहिनी सीसीटीव्हीने याविषयीचे वृत्त दिले आहे.

कोयना नगर (जिल्हा सातारा) येथील धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोयना नगर येथील कोयना धरण परिसराला भूकंपाचे २ सौम्य धक्के बसले. ८ मे या दिवशी दुपारी १.५५ वाजता पहिला धक्का, तर १.५८ वाजता दुसरा धक्का बसला.

हिमालयातील बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात सिद्ध होत आहेत तलाव !

जगात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बर्फाच्छादित डोंगर वितळत आहेत. भारतातील हिमालयातही हीच स्थिती आहे. यामुळे येथील तलावांमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे.

गेल्या ६ वर्षांपासून चीनकडून जैविक शस्त्रांद्वारे तिसरे महायुद्ध करण्याचे नियोजन !

कोरोनाची मूळ उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे, हे सध्या लोक विसरले आहेत आणि चीनमध्येही याचा प्रभाव केव्हाच ओसरून चीनमध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे दळणवळण चालू आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील गुप्तचरांना चीनचा एक अहवाल सापडला आहे. १८ तज्ञांनी लिहिलेल्या या अहवालातून लक्षात आले आहे की, चीन ६ वर्षांपासून तिसर्‍या महायुद्धासाठी कोरोनासारखे जैविक शस्त्र बनवत होता आणि त्याने प्रत्यक्षात कोरोनाच्या माध्यमातून तिसरे युद्ध चालू केले आहे.

आशादायी पाऊल !

केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्रामुळे कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर अभ्यास चालू केला असल्याची बातमी वाचणेसुद्धा आनंददायी आहे. यावर संशोधन करण्यासाठी सरकारकडून हृषिकेश येथील ‘एम्स्’ रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

तिसरी धोक्याची घंटा !

कोरोनाची दुसरी लाट एकप्रकारे सुनामीच आहे, याचा प्रत्यय प्रतिदिन येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण आणि तितकीच भयावह आहे; कारण या लाटेतील मृत्यूदर आधीच्या लाटेपेक्षा पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे ‘मृत्यूचे थैमान’ आदी शब्दही अपुरे पडतील. ती अजून संपलीही नाही आणि त्यात आता समोर येऊन ठेपली आहे तिसरी लाट !