सनातन संस्थेने धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य हाती घेतले आहे ! – पू. (डॉ.) श्री अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे

रायबाग (बेळगाव) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवांत
पू. (डॉ.) अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग-२०२०’चे प्रकाशन

रायबाग येथे ‘सनातन पंचांग-२०२०’चे प्रकाशन करतांना पू. (डॉ.) अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी

बेळगाव – बेळगाव जिल्ह्यात शहर, रायबाग, शहापूर, महांतेश नगर, गोकाक या ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले. रायबाग (बेळगाव) येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री गुरुदेव ब्रह्मानंद आश्रम, परमानंदवाडी येथील पू. (डॉ.) अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग-२०२०’चे प्रकाशन करण्यात आले, तसेच विश्व हिंदू परिषदचे तालुका अध्यक्ष श्री. सदानंद नाईक यांचा सत्कार पू. अभिनव स्वामीजींच्या हस्ते करण्यत आला.

 

सनातन संस्थेने धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य
हाती घेतले आहे ! – पू. (डॉ.) श्री अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी

“सनातन संस्था स्वत:ला विकसित करण्यासाठी स्वार्थी भावनेने कार्य करत नाही, तर संपूर्ण सनातन संस्कृतीला विकसित करण्याचे, धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य तिने हाती घेतले आहे. मागील १२ वर्षे मी सनातन संस्थेच्या संपर्कात आहे. त्यांची सात्त्विक उत्पादने, तसेच प्रकाशित झालेल्या सनातन पंचांगाचा मी नियमित उपयोग करतो. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी वंदन करतो. ते करत असलेले कार्य अत्यंत महान आहे. सर्वांनी या संस्थेच्या कार्याला साहाय्य करणे काळाची आवश्यकता आहे,” असे  उद्गगारपू. (डॉ.) अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी यांनी रायबाग (बेळगाव) येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात काढले

 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या समवेत कार्य करा ! – पंकज घाडी, देसूर

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी जवळून पाहिले आहे. राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, संस्कृती रक्षण या सर्व स्तरांवर संस्था कार्य करत आहे. समिती आणि संस्था यांचेे कार्य गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालू आहे. त्यामुळेच त्यांना प्रत्येक कार्यात यश लाभते. आजची युवा पिढी धर्मशिक्षणाच्या अभावी व्यसनाधीन झाली आहे, लव्ह जिहादला बळी पडत आहे. यासाठी आपण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासमवेत कार्य करणे ही काळाची आवश्यकता आहे.

खानापूर येथील गुरुपौर्णिमेला उपस्थित धर्मप्रेमी

बेळगाव येथे ह.भ.प. पू. वासुदेव पुरुषोत्तम गिंडे महाराज, तसेच खानापूर येथील महोत्सवाला सनातन संस्थेचे पू. शंकर गुंजेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी गोकाक येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला भाजपचे आमदार श्री. अशोक पुजारी, तर शहापूर येथे भाजपचे उत्तर बेळगाव उपाध्यक्ष श्री. मारुती सुतार हे मान्यवर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment