१. सनातन वह्यांची वैशिष्ट्ये
१ अ. विद्यार्थ्यांच्या मनावर भारताचा उज्ज्वल इतिहास बिंबवणारे लिखाण वह्यांवर प्रसिद्ध केले जाते ! : ‘सनातनने प्रसिद्ध केलेल्या ‘संस्कार वही’वर विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे, त्यांना हिंदु संस्कृतीचे पालन करण्यास शिकवणारे, धर्मशिक्षण देणारे आणि राष्ट्रप्रेम वाढवणारे लिखाण अन् चित्रे असतात. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालक आणि शिक्षक या सर्वांनाच आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकते.
१ आ. या वह्यांच्या पानांची गुणवत्ता उत्तम आहे.
२. ‘संस्कार वही’ पुढील प्रकारांमध्ये उपलब्ध !
३. संस्कार वही घरोघरी पोचवण्यासाठी पुढील प्रयत्न करावेत !
अ. शाळेचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून विद्यार्थ्यांसाठी वह्या घेण्यास प्रवृत्त करावे.
आ. शिकवणीवर्ग (क्लासेस) चालकांची अनुमती घेऊन वर्गातील विद्यार्थ्यांना सनातन वह्यांविषयी माहिती सांगावी.
(सध्या शाळांना सुटी असली, तरी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिकवणीवर्ग चालू असतात.)
इ. स्टेशनरीच्या साहित्याची विक्री करणार्या दुकानदारांना संपर्क करून वह्यांची माहिती सांगता येईल.
ई. काही लोकप्रतिनिधी (नगरसेवक, आमदार, खासदार आदी) त्यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या आदी शालोपयोगी वस्तूंचे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येत वाटप करतात. त्यांना वहीविषयी सांगता येईल.
उ. वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी यांना वहीचे महत्त्व सांगून ती विकत घेण्याची विनंती करावी. त्यांना त्यांचे नातेवाईक, स्नेही आदींनाही वही विकत घेण्यासाठी प्रवृत्त करण्यास सांगावे.
ऊ. आप्तेष्ट, परिचित आणि स्नेही यांना वहीची माहिती सांगून वैयक्तिक वापरासाठी वही घेण्यास उद्युक्त करता येईल. उपनयन, वाढदिवस आदी शुभप्रसंगी इतरांना वही भेट देण्यासही त्यांना सुचवू शकतो.
४. वह्या विक्रीसाठी सार्वजनिक ठिकाणी कक्ष उभारण्याचे नियोजन करा !
जूनच्या पहिल्या आठवड्यात गर्दी असणार्या मंदिरांचा परिसर, बसस्थानक, शहरातील मुख्य चौक, मोठी उद्याने आदी ठिकाणी ‘सनातन वही’चा कक्ष लावावा. या कक्षावर सनातन वह्यांचे वैशिष्ट्य सांगणारे फलक लावू शकतो.
५. धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून वह्यांविषयी जागृती करता येईल.
६. वह्या प्रायोजित होण्यासाठी समाजात संपर्क करा !
वह्यांसाठी प्रायोजक मिळवण्याच्या दृष्टीने मागील वर्षीच्या प्रायोजकांच्या सूचीसह या वर्षी संपर्कात आलेल्या हितचिंतकांच्या नवीन सूचीचाही अभ्यास करावा. वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी हिंदू यांना वह्या प्रायोजित करण्यासाठी उद्युक्त करावे.
भावी पिढीवर सुसंस्कार होऊन सात्त्विक समाजाची निर्मिती व्हावी, या उद्देशाने प्रसिद्ध केल्या जाणार्या या वह्यांचे अधिकाधिक वितरण करून समाज-निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हा !’