पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

अरबी समुद्र दिवसेंदिवस तापत आहे. पर्यावरणातील पालटांमुळे हा प्रकार चालू आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वादळे येतच रहाणार, अशी चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे, असे वृत्त दैनिक तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे.

काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता सापडला पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण !

काळ्या आणि पांढऱ्या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के !

पश्‍चिम महाराष्ट्रात २३ मे या दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ‘रिश्टर स्केल’वर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !

एक महाकाय हिमनग वितळला आहे. हा हिमनग स्पेनच्या माजोरका बेटाच्या आकाराइतका आहे. उपग्रह आणि विमान यांद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून हे दृश्य दिसून आले. हा जगातील आतापर्यंतचा सर्वांत महाकाय बर्फाचा तुकडा आहे, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अँटार्क्टिकामधील बर्फाचा एक मोठा तुकडा वितळला होता.

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे. पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये भरती असलेल्या कोरोनाच्या ४ रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा संसर्ग दिसून आला आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

‘मुंबई हाय’ परिसरात ‘अ‍ॅफकॉन्स’ या आस्थापनाकडून तेल विहिरींचे काम करत असलेल्या अरबी समुद्रातील जहाजांना तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे समुद्रातील ३ जहाजे भरकटली असून त्यांतील ‘बोर्ड हाऊसिंग बार्ज पी ३०५’ हे जहाज बुडाले असून त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला आहे

विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘येत्या काळात अनेक वैश्‍विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्‍व तिसर्‍या महायुद्धाकडे चालले आहे.

संतांनी एकामागोमाग एक देहत्याग करणे, ही आपत्काळाची नांदीच !

‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ पूर्वेकडील बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टींवर धडकण्याची चेतावणी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. बंगालमध्ये २५ मे या दिवशी, तर ओडिशामध्ये २६ मे या दिवशी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

पुन्हा इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष !

पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलच्या काही शहरांवर १ सहस्र ४०० रॉकेटचा मारा केला. असे आक्रमण म्हणजे देशाच्या अस्तित्वावर आक्रमण, असे इस्रायल मानतो. त्यामुळे इस्रायलने पूर्ण त्वेषाने हमासला प्रत्युत्तर देत हवाई आक्रमण केले.